विनापरवाना औषधींची साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:53 PM2019-05-21T23:53:13+5:302019-05-21T23:53:33+5:30

विनापरवाना औषधसाठा गोळा करून ठेवणाऱ्या वरूड येथील भवानी मेडिकल अँड सर्र्जिकल्सचे संचालक सांरग नारायण चौधरी यांच्या घरावर सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. त्यांच्या घरातून तब्बल २ लाख ४४ हजार १४५ रुपयांचा अ‍ॅलोपॅथिक औषधसाठा एफडीएने जप्त केला आहे. या घटनेमुळे वरुड येथील औषध व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Unannounced Medicines Storage | विनापरवाना औषधींची साठवणूक

विनापरवाना औषधींची साठवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देएफडीएची वरुडमध्ये धाड : अडीच लाखांचा साठा जप्त

अमरावती : विनापरवाना औषधसाठा गोळा करून ठेवणाऱ्या वरूड येथील भवानी मेडिकल अँड सर्र्जिकल्सचे संचालक सांरग नारायण चौधरी यांच्या घरावर सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. त्यांच्या घरातून तब्बल २ लाख ४४ हजार १४५ रुपयांचा अ‍ॅलोपॅथिक औषधसाठा एफडीएने जप्त केला आहे. या घटनेमुळे वरुड येथील औषध व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एफडीए सूत्रानुसार, सारंग चौधरी (रा. भवानी मंदिराजवळ) यांचे वरुड येथील इंदिरा चौकात भवानी मेडिकल अ‍ॅन्ड सर्जिकल्स नामक औषधविक्रीचे प्रतिष्ठान होते. याशिवाय ते ग्रामीण भागात हॉस्पिटलला औषधी पुरवठा करीत होते. एकाच परवान्यावर दोन कामे करीत असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या निदर्शनास आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. त्यांनी तो परवाना एफडीएकडे जमा केला. शिल्लक औषधसाठा चौधरी यांनी एफडीएच्या परवानगीने संबधितांकडे परत पाठवायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे न करता तो घरात गोळा करून ठेवला. हा प्रकार एफडीएच्या निदर्शनास आल्यानंतर सोमवारी औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सी.के. डांगे यांच्या मार्गदर्शनात औषधी निरीक्षक उमेश घरोटे व मनीष गोतमारे यांनी सारंग चौधरी यांच्या वरूड येथील प्रतिष्ठानावर धाड टाकली. त्यांच्या घरातून औषधी जप्त केल्या. याप्रकरणी एफडीएने सारंग चौधरीविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम १८(क) नुसार कारवाई केली आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी औषधसाठ्यातील एक नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे.
अ‍ॅलोपॅथिक औषध जप्त
सारंग चौधरी यांच्या घरात अ‍ॅन्टीबॉयोटीक, विटामीन, वेगवेगळ्या क्रिम, कप्सुल, टॅबलेट, सायरप, ईअर ड्राप, आय ड्राप अशा प्रकारच्या विविध अ‍ॅलोपॅथिक औषधीचा साठा आढळून आला आहे. विना परवाना या औषधी विक्री करणे हे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता असते, त्यामुळे एफडीएने तो साठा जप्त केला.
आरोग्याशी खेळ
एफडीएचा परवाना नसतानाही औषधी विक्री केल्यास, असे कृत्य नागरिकांच्या आरोग्याला धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे विना परवाना औषधींची विक्री किंवा साठवणूक कोणी करीत असेल, त्याची माहिती एफडीएला कळवा, असे आवाहन सहायक आयुक्त सी.के.डांगे यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: Unannounced Medicines Storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.