बडनेऱ्यात तीन ट्रक लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:48 PM2018-12-19T22:48:42+5:302018-12-19T22:49:21+5:30

अवैध लाकूड वाहून नेणाºया तीन ट्रकला वनविभागाच्या फिरत्या पथकाने १९ डिसेंबर रोजी बडनेऱ्याच्या बस स्थानकासमोरून जाणाºया महामार्गावर पकडले. हा लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे.

Three truck lumber seized in Badnera | बडनेऱ्यात तीन ट्रक लाकूड जप्त

बडनेऱ्यात तीन ट्रक लाकूड जप्त

Next
ठळक मुद्दे२० टन लाकूड : वनविभागाच्या फिरत्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अवैध लाकूड वाहून नेणाºया तीन ट्रकला वनविभागाच्या फिरत्या पथकाने १९ डिसेंबर रोजी बडनेऱ्याच्या बस स्थानकासमोरून जाणाºया महामार्गावर पकडले. हा लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे.
एमएच ३५ के ६१५ क्रमांकाचा ट्रक तसेच एमएच २७ एक्स १६३१ व एमएच २७ ए ३९६४ क्रमांकाच्या मालवाहू वाहनांमधून अवैध लाकूड नांदगाव खंडेश्वरहून बडनेरा शहराकडे येत असल्याची माहिती वनविभागाच्या फिरत्या पथकाला मिळाली. त्याआधारे बडनेरा बस स्थानकासमोर सापळा रचून ही तिन्ही वाहने वनविभागाच्या पथकाने पकडली. त्यांना वनविभागाच्या बडनेरा वर्तुळ कार्यालयात नेण्यात आले आणि लाकडाचे वजन करण्यात आले. २० टन लाकूड शहराकडे येत होते. त्यापैकी ट्रक दिग्रसहून, तर मालवाहू वाहने नांदगाव खंडेश्वर येथून येत होती, अशी माहिती वनविभागाने दिली. याप्रकरणी महाराष्ट्र वननियमावली २०१४ चे कलम ३१ अन्वये करण्यात आली. पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी एन.व्ही. धंदर, सहायक वनपाल विशाल भटकर, एस.आर. आखरे, जी.डी. साखरकर, के.बी. धोटे, सुभाष गवई, प्रमोद राऊत, विठ्ठल चौके यांचा समावेश होता.
रहदारी परवाना नाही
या तिन्ही चालकांकडे रहदारी परवाना नसल्याचे आढळून आले. ट्रकमध्ये बाभूळ व जळाऊ लाकूड वाहून नेले जात होते, अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.
शहरात येत आहे अवैध लाकूड
वनविभागाच्या फिरत्या विभागाने तीन वाहनांतील अवैध लाकूड पकडले. कारवाई मोहीम जोमात राबविल्यास वने भकास होणार नाहीत, अशा वन्यजीवप्रेमींच्या भावना आहेत.

Web Title: Three truck lumber seized in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.