शिवगडावर हजारो मावळे नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:29 PM2019-02-19T22:29:14+5:302019-02-19T22:30:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषाने सोमवारी शहर दुमदुमले. यानिमित्त ...

Thousands of maval pavilas on Shivgad | शिवगडावर हजारो मावळे नतमस्तक

शिवगडावर हजारो मावळे नतमस्तक

Next
ठळक मुद्देवाहन रॅली, शोभायात्रा, ढोलपथकांनी वेधले लक्षशिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषाने सोमवारी शहर दुमदुमले. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. मुख्य मार्गांनी भगवे फेटे बांधून युवकांनी दुचाकी रॅली काढली. येथील शिवगड (शिवटेकडी) येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सव समिती व महापालिकेतर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
शहरातील शिवगडावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. बबनराव बेलसरे आणि प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक तथा कीर्तनकार नितीन मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. व्यासपीठावर, शिवटेकडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बूब, नगरसेविका रीता पडोळे, उद्योजक तथा नगरसेवक नितीन देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित ठोसरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीला पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रणजित तिडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांसह शिवपे्रमींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सुरेंद्र भुयार, मयूरा देशमुख, सचिन चौधरी, अरविंद गावंडे, नीलिमा विखे, प्रीती बुजरूक, अविनाश कोठाडे, मोनाली तायडे, प्रतिभा देशमुख यांच्यासह संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, मराठा कुणबी संघटना व इतर संघटनांचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षवेधी सहभाग
शिवरायांचा इतिहास हा सर्वांना प्रभावित करतो. देशप्रेमाची धारा रोमरोमांतून वाहती ठेवणाऱ्या या इतिहाराची धुरा यंदाच्या शिवजयंती रॅली युवा वर्ग, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाहिली. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पुतळा वाहनावर चढवून शहरातून प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढली, प्रो. राम मेघे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुचाकी रॅली काढली. सायन्स कोअर मैदानातून रॅलीला प्रारंभ झाला, तर आपआपल्या महाविद्यालयांमध्ये रॅलीचा समारोप झाला. विद्यार्थिनींचा पारंपरिक पहेराव व विद्यार्थ्यांचे सफेद कुर्त्यावर भगवे फेटे अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेत होते. ढोलताशा पथकासह शिवरायांचा गगनभेदी जयघोषामुळे आसमंत दुमदुमला. राजकमल चौकात मेघे अभियांत्रिकीच्या तलवारधारी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक सादर करून वाहवा मिळविली.
शिवटेकडी नव्हे शिवगड
शिवजयंतीनिमित्त येथील शिवटेकडीवर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती कार्यक्रम मंगळवारी सकाळी साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित ठोसरे यांच्यासह जिल्हा सचिव उज्ज्वल गावंडे व मयूरा देशमुख यांनी शिवटेकडीऐवजी ‘शिवगड’ असे नामाधिदान करण्यात यावे, यासाठी आवाज बुलंद केला. याविषयी महापालिका आयुक्तांना निदेवन देण्यात येणार आहे.

Web Title: Thousands of maval pavilas on Shivgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.