पंढरपूर स्पेशल रेल्वे हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:22 PM2019-07-04T23:22:27+5:302019-07-04T23:22:43+5:30

मध्य रेल्वे भुसावळ विभागाने अमरावती- पंढरपूर रेल्वे विशेष गाडी ६ व ९ जुुलै रोजी सोडणार आहे. या गाडीचे स्लिपर आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून, वातानुकूलित दोन बोगीत बर्थ उपलब्ध आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही विशेष रेल्वे गाडी असून, नवीन अमरावती रेल्वे स्थानकाहून सोडली जाणार आहे.

Pandharpur Special Railway HouseFull | पंढरपूर स्पेशल रेल्वे हाऊसफुल्ल

पंढरपूर स्पेशल रेल्वे हाऊसफुल्ल

Next
ठळक मुद्देस्लिपरचे आरक्षण नाही : वातानुकूलित बर्थ उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागाने अमरावती- पंढरपूर रेल्वे विशेष गाडी ६ व ९ जुुलै रोजी सोडणार आहे. या गाडीचे स्लिपर आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून, वातानुकूलित दोन बोगीत बर्थ उपलब्ध आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही विशेष रेल्वे गाडी असून, नवीन अमरावती रेल्वे स्थानकाहून सोडली जाणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरते. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेले वारकरी, विठ्ठलभक्त पंढरपूर येथे न चुकता जातात. मात्र, पंढरपूर येथे ये-जा करताना विठ्ठलभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ही सोय करण्यात आली आहे. यंदा ६ जुलै रोजी पहिली ट्रेन ही पंढरपूरकडे दुपारी २ वाजता रवाना होणार आहे. पंढरपूर येथून अमरावतीकडे ७ व १३ जुलै रोजी परत येणार आहे. पंढरपूर येथून दुपारी ४.३० वाजता ही विशेष गाडी सुटणार असून, नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी १०.३० वाजता पोहचेल. या गाडीला एकूण १५ बोगी राहील. यात ८ डबे जनरल, पाच स्लिपर,दोन वातानुकूलित डबे असेल. ६ जुलै रोजी पंढरपूरकडे जाणाऱ्या विशेष गाडीच्या एसी डब्यात ६९ बर्थ शिल्लक आहेत. स्लिपर डब्याचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे.

Web Title: Pandharpur Special Railway HouseFull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.