१३० रुग्णांनी केली अपंगत्वावर मात

By Admin | Published: August 29, 2015 12:31 AM2015-08-29T00:31:23+5:302015-08-29T00:31:23+5:30

गुरुकूंज मोझरी येथे अपंगाना कृत्रिम हात, पाय बसविण्याचे विदर्भस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Over 130 patients overcome disability | १३० रुग्णांनी केली अपंगत्वावर मात

१३० रुग्णांनी केली अपंगत्वावर मात

googlenewsNext

गुरुकुंज मोझरी येथे शिबिर : वासवानी मिशन, संजय देशमुखांचा उपक्रम
तिवसा : गुरुकूंज मोझरी येथे अपंगाना कृत्रिम हात, पाय बसविण्याचे विदर्भस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ३०० वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असलेल्या रुग्णांची नोंदणी झाली. त्यामधून १३० रुग्णांची निवड करण्यात आली. ज्या रुग्णांना हात, पाय नाहीत अशा रुग्णांची संपूर्ण तपासनी करुन कृत्रिम अवयवासाठी प्रत्यक्ष मोजमाप करण्यात आले.
साधू वासवानी मिशन पूणे यांच्यावतीने तपासणी मोजमाप करण्यात आलेल्या १३० रुग्णांना कृत्रिम अवयव मोझरी येथे संपन्न झालेल्या शिबिरामध्ये बसवून देण्यात आले. सर्व रुग्णांनी अपंगत्वावर मात करीत कृत्रिम अवयवांच्या साह्याने आपल्या जीवनामध्ये पुन्हा नियमित चालायला सुरुवात केली.
हात व पाय नसल्यामुळे त्याचे जीवन संपूर्णत: थांबलेच होते, संजय देशमुख मित्र परिवार तथा साधू वासवानी मिशन पूणे यांच्यामुळे ते पुन्हा चालायला लागले. कृत्रिम अवयव मिळाल्यामुळे प्रत्येक अपंगाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद व उत्साह दिसत होता.
कृत्रिम हात, पाय बसल्यावर आपणही चालू, फिरू शकतो याचे स्मितहास्य प्रत्येक रुग्णांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आयुष्यात आपण काही गमवले नसून खूप काही आज या शिबिराच्या माध्यमातून मिळविले ही ऊर्जा स्वत: चालत जाताना सर्व रुग्ण बोलून गेलेत. या शिबिरासाठी योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, प्रवीण रहाटे, संदीप हगवणे, प्रेमानंद कांडलकर, धीरज बनारसे, योगेश भुसारी, शरद खारोडे, नीलेश राऊत, राहुल केनेकर, गजू काळे, आशिष तेलंग, प्रदीप सोनोने, सुधीर चौधरी, अशोक लांजेवार, नौशाद बे, संतोष भोंगाडे, मोहन भुसारी, सुनील साठवणे, सदानंद आखरे, साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव, सुशील ढगे, जैन यांची उपस्थितीत व सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Over 130 patients overcome disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.