जरूडमध्ये टॉवरसाठी उपटली संत्राझाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:50 PM2019-07-15T23:50:49+5:302019-07-15T23:51:07+5:30

विद्युत वाहिनीकरिता एका संत्राउत्पादक शेतकऱ्याच्या शिवारातील संत्राझाडे उपटून फेकल्याचा प्रकार येथे सोमवारी दुपारी उघड झाला. महापारेषणच्या अभियंता व कंत्राटदाराने हा प्रताप केल्याची माहिती होताच संबंधित शेतकरी विषाची बॉटल घेऊन शेतात पोहोचला.

The oranges planted up to the tower in Jurud | जरूडमध्ये टॉवरसाठी उपटली संत्राझाडे

जरूडमध्ये टॉवरसाठी उपटली संत्राझाडे

Next
ठळक मुद्देशेतकऱ्याने घेतली विषाची बाटली : पोलिसांकडून धमक्या, महावितरणने नुकसानभरपाई नाकारली

लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड : विद्युत वाहिनीकरिता एका संत्राउत्पादक शेतकऱ्याच्या शिवारातील संत्राझाडे उपटून फेकल्याचा प्रकार येथे सोमवारी दुपारी उघड झाला. महापारेषणच्या अभियंता व कंत्राटदाराने हा प्रताप केल्याची माहिती होताच संबंधित शेतकरी विषाची बॉटल घेऊन शेतात पोहोचला. त्या शेतकऱ्यांने त्यांचा पाठलाग केला. मात्र, अभियंता, कंत्राटदार व भरीस भर आलेले पोलीसही तेथून परागंदा झाले.
बेनोडा-लोणी रस्त्यावर प्रदीप कांबळे यांच्या मालकीचे शेत आहे. त्यात संत्राझाडांसह कपाशीचे पीक आहे. १५ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास महापारेषण, महावितरण अधिकारी, कर्मचारी पोलीस ताफा घेऊन कांबळे यांच्या शेतात गेले. त्यांनी शेतातील आठ ते दहा संत्रा झाडे जेसीबीने उपटली. यात कपाशीचे मोठे नुकसान केले. याबाबत कांबळे यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. संत्राझाडे उपटल्याचे माहिती होताच कांबळे यांना मिळताच ते विषाची बाटली घेऊन शेतात गेले. तेव्हा अधिकारी, अभियंते व पोलीस त्यांच्या शिवारातच होते. कांबळे यांनी त्यांना विचारणा केली. मात्र त्यांनी कांबळे यांनाच फटकारले. त्यामुळे संतापलेले कांबळे हे अधिकारी आणि कामगाराच्या अंगावर धावले. तेव्हा पोलिसांसह अधिकाऱ्यांनीही तेथून काढता पाय घेतला.
ठाणेदाराची मध्यस्थी अयशस्वी
प्रदीप कांबळे हे बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता गेले असता, ठाणेदार सुनील पाटील यांनी त्यांना समाजावले. महावितरण, महापारेषणने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, असा मध्यम मार्ग सूचविला. मात्र, महावितरणच्या अधिकाºयांनी नकार दिला. त्यामुळे तहसीलदार आणि ठाणेदारांना निवेदन वजा तक्रार देण्यात आली.

माझ्या शेतात धमक्या देऊन टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. संत्रा झाडांचे नुकसान केले आहे. सोमवारी मलाच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांकडून देण्यात आली.
- प्रदीप कांबळे
शेतकरी, जरुड

टॉवर उभारणीदरम्यान कांबळे यांच्या शेतातील संत्रा झाडे उपटण्यात आली. कांबळे तक्रार देण्यास आले होते. त्यांना मोबदला देण्यात यावा, तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे सुचविले. यावेळी पोलीस संरक्षण देण्यात आले होते.
- सुनील पाटील
ठाणेदार, बेनोडा

Web Title: The oranges planted up to the tower in Jurud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.