ना खडीकरण, ना सांडपाण्याचे व्यवस्थापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:06 PM2018-12-15T22:06:50+5:302018-12-15T22:07:17+5:30

खडीकरणासाठी २२ लाख रुपये मंजूर असतानाही त्या कामास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले. ही व्यथा आहे, प्रभाग १ मधील गिरीजा विहार व रामनगरवासीयांची. सन २००८ पासून या भागात नागरीकरण वाढले; मात्र पायाभूत सुविधांची वानवा असल्याने १० जानेवारीपासून महापालिका परिसरात उपोषणास बसण्याची पूर्वसूचना या रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना दिली.

No stagnation, no sewage management! | ना खडीकरण, ना सांडपाण्याचे व्यवस्थापन!

ना खडीकरण, ना सांडपाण्याचे व्यवस्थापन!

Next
ठळक मुद्देगिरीजा विहार-रामनगरवासीयांची व्यथा : १० जानेवारीपासून उपोषणाला बसणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खडीकरणासाठी २२ लाख रुपये मंजूर असतानाही त्या कामास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले. ही व्यथा आहे, प्रभाग १ मधील गिरीजा विहार व रामनगरवासीयांची. सन २००८ पासून या भागात नागरीकरण वाढले; मात्र पायाभूत सुविधांची वानवा असल्याने १० जानेवारीपासून महापालिका परिसरात उपोषणास बसण्याची पूर्वसूचना या रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना दिली.
दहा वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या गिरीजा विहार-रामनगर भागातील रस्त्यांच्या खडीकरणासाठी सन २०१६ मध्ये १९ लाख ३५ हजार ७२२ रुपये मंजूर करण्यात आले. तत्कालीन नगरसेवक राजू मानकर व स्वाती निस्ताने यांनी ती रक्कम आरक्षित करवून घेतली. नंतर त्या कामाच्या २२.१३ लाख इतक्या वाढीव किमतीला मार्च २०१८ मध्ये मान्यता देण्यात आली. तथापि, नऊ महिने उलटूनही खडीकरणास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ट्रक उलटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या परिसरात २००८ पासून मोठे अपार्टमेंट व घरे झाली. मात्र, नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी परिसरात जमा होते. त्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या, डेंग्यूसदृश आजार निर्माण होत असल्याचे वास्तव आहे.
२०११ पासून पाठपुरावा
गिरीजा विहार व रामनगरवासीयांनी पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी सन २०११ पासून महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार चालविला आहे. ५ मार्च २०११, ९ फेब्रुवारी २०१२, २ एप्रिल २०१४, २ एप्रिल २०१४, ११ एप्रिल २०१५, ३ आॅगस्ट २०१६ ,९ फेब्रुवारी २०१७ व ११ सप्टेंबर २०१८ रोजी निवेदने देण्यात आली. तथापि, प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही समस्या मार्गी लागली नसल्याने त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
कर भरणार नाही
महापालिकेने आकारलेले विकास शुल्क व प्रत्येक वर्षातील मालमत्ता कराचा नियमित भरणा करण्यात आला. मात्र, तुलनेने सुविधांची वानवा आहे. त्यामुळे महापालिकेचा कर न भरण्याचा निर्णय गिरिजा विहार व रामनगरवासीयांनी घेतला आहे.

Web Title: No stagnation, no sewage management!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.