नवविवाहित पोलिसाचा अपघातात मृत्यू; पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:40 AM2019-06-21T01:40:04+5:302019-06-21T01:40:37+5:30

एका नवविवाहित पोलीस दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगावनजीक ही घटना घडली.

Newly-married policeman dies in accident; Wife injured | नवविवाहित पोलिसाचा अपघातात मृत्यू; पत्नी जखमी

नवविवाहित पोलिसाचा अपघातात मृत्यू; पत्नी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : एका नवविवाहित पोलीस दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगावनजीक ही घटना घडली.
नीलेश विठ्ठलराव ठाकरे (३०, सुरवाडी ता.तिवसा) असे मृताचे नाव असून, तो राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१५ गोंदिया येथे कार्यरत होता. जखमी झालेल्या पूनम नीलेश ठाकरे (२७, सुरवाडी) या नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. १६ मे रोजी तिवसा येथे त्यांचा विवाह झाला होता.
नीलेश हा बुधवारी दुपारी अमरावतीला गेला होता. पत्नीला घेऊन तो रात्रीच्या सुमारास एमएच २७ सीएच- ८९०३ या दुचाकीने सुरवाडी येथे जात होता. मात्र, शिवणगावनजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात नीलेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी जखमी झाली. तिला उपचारासाठी प्रथम तिवसा ग्रामीण रुग्णालयात व नंतर अमरावती येथे हलविण्यात आले. धडक मारणारे वाहन अज्ञात असून, वृत्त लिहिस्तोवर त्याचा शोध लागला नव्हता. तिवसा व नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
 

Web Title: Newly-married policeman dies in accident; Wife injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.