शहरातील अनेकांचे फेसबुक हॅक, सायबर ठाण्यात तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:07 PM2018-11-14T23:07:49+5:302018-11-14T23:08:36+5:30

आपल्या नावाचे फेसबुक खाते उघडून आक्षेपार्ह संदेश किंवा छायाचित्र अपलोड करणारे सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून, शहरातील अनेकांचे फेसबुक खाते हॅक करून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड केल्याचे प्रकार हल्ली उघड होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांपासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Many of the city's Facebook Hack, Cyber ​​Thane Complaints | शहरातील अनेकांचे फेसबुक हॅक, सायबर ठाण्यात तक्रारी

शहरातील अनेकांचे फेसबुक हॅक, सायबर ठाण्यात तक्रारी

Next
ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांपासून सावधान : फेसबुक खात्याचा दुरुपयोग होण्याचा संभव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपल्या नावाचे फेसबुक खाते उघडून आक्षेपार्ह संदेश किंवा छायाचित्र अपलोड करणारे सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून, शहरातील अनेकांचे फेसबुक खाते हॅक करून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड केल्याचे प्रकार हल्ली उघड होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांपासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
फेसबुक खात्याचा दुरुपयोग करणारे सायबर गुन्हेगार आपल्याला अडचणीत किंवा मानसिक तणावात आणण्याचे प्रकार करीत आहे. सायबर पोलिसांना अशापद्धतीच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असून, नागरिकांनी इंटरनेट हाताळताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत पोलिसांचे आहे. मंगळवारी रात्री शहरातील एका व्यक्तीच्या नावाने असणाऱ्या फेसबुक खात्याचा दुरुपयोग करून अश्लील छायाचित्रे टाकण्यात आले. आपण फेसबुक उघडले नाही किंवा त्यावर काही छायाचित्रे अपलोड केली नाहीत. मात्र, आपल्याच नावाच्या खात्यावर अश्लील फोटो अपलोड झाले तरी कसे, असा प्रश्न संबंधित फेसबुकधारकाला पडला होता. हा प्रकार घडताच संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचे फोन कॉल सुुरू झाले. तुम्ही अशाप्रकारचे अश्लील फोटो अपलोड केले तरी कसे, आदी प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. त्यामुळे संबंधित व्यक्ती तणावात आले. हा खोडसळपणा कुणी केला व कसा झाला, याबाबत संंबंधित व्यक्तीने सायबर पोलिसांकडे विचारणा केली असता, ते फेसबुक खाते हॅक झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, फेसबुक खाते हॅक करून अश्लील छायाचित्रे अपलोड झाल्याचा मानसिक त्रास संबंधित व्यक्तीला सोसावा लागला. अखेर पोलिसांनी ते फेसबुक खाते कायमचे डिलीट केल्यानंतरच संबंधित भयभीत झालेल्या व्यक्तीने सुटकेचा नि:श्वास सोडला. .
हॅक करणारे जवळचेच
बदनामी व नुकसान करण्याच्या उद्देशाने काही जवळीच व्यक्ती आपल्या मोबाईलचा वापर करू शकतात. त्यामुळे विश्वासात असणाऱ्या जवळच्या व्यक्तीसोबतच मोबाईल शेअर करा, जवळच्या व्यक्तींना फेसबुक खात्याचे पासवर्ड माहिती असू शकतात. त्यामुळे फेसबुक खाते हॅक करणे सहज शक्य होते.
फेसबुक हाताळताना अशी घ्या काळजी
मोबाईलवर फेसबुक खात्याचा उपयोग करीत असाल, तर कोणाच्याही हाती मोबाईल देऊ नका, फेसबुक खात्याचा पासवर्ड कुणाला सांगू नका, पासवर्डमध्ये अक्षर, अंक व सिम्बॉल, अशा पद्धतीचा असावा, आपले किंवा आपल्या कुटुंबातील नावाचे पासवर्ड हॅक करण्यास सोपे होऊ शकते. त्यामुळे शक्यतेवर पासवर्ड वेगळ्या पद्धतीचा असावा. याशिवाय टू स्टेप व्हेरीफिकेशन या आॅप्शनचा वापर करा, पासवर्ड टाकल्यानंतर मोबाईलवर संदेश प्राप्त होईल. ओटीपी क्रमांक टाकल्यावर फेसबुक खाते सुरू होईल, अशीही पद्धत फेसबुक सुरक्षेसाठी उपयोगी पडते
५० लाख नागरिकांचा डेटा चोरी
दोन ते तीन महिन्यांपूर्वी ५० लाख फेसबुक खातेदारांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याची माहिती फेसबुकने उघड केली होती. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता असून, असे प्रकार घडत असल्याचे सायबर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी सांगितले.

फेसबुक हॅक करून आक्षेपार्ह संदेश किंवा छायाचित्रे अपलोड केल्याचे प्रकार घडत आहेत. तशा तक्रारीसुद्धा आल्या होत्या. त्यामुळे मोबाईल हाताळताना नागरिकांनी सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी. बदनामी व नुकसान करण्याच्या उद्देशाने जवळचेच व्यक्ती असले प्रकार करू शकतात.
-ईश्वर वर्गे,
पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Many of the city's Facebook Hack, Cyber ​​Thane Complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.