माहुली अत्याचारप्रकरणी कुणाचाही मुलाहिजा नाही

By admin | Published: August 29, 2015 12:34 AM2015-08-29T00:34:36+5:302015-08-29T00:34:36+5:30

मुंबईहून अमरावतीला पोहोचताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी माहुली (जहागीर) येथे भेट देऊन मृत साहिल डायरेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Mahuli does not have any children in the case of atrocities | माहुली अत्याचारप्रकरणी कुणाचाही मुलाहिजा नाही

माहुली अत्याचारप्रकरणी कुणाचाही मुलाहिजा नाही

Next

अमरावती : मुंबईहून अमरावतीला पोहोचताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी माहुली (जहागीर) येथे भेट देऊन मृत साहिल डायरेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या व गावात शांतता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर यवतमाळ येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माहुलीतील घटनेविषयी चर्चा करून गावकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.
माहुलीत २५ आॅगस्ट रोजी सकाळी उद्रेक झाल्याने पोलिसांनी गावकऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले. हा उद्रेक सुरु असतानाच सर्व प्रथम आमदार यशोमती ठाकूर यांनी गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही पोलिसांच्या लाठीचार्जचा सामना करावा लागला. त्यानंतर जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे व तहसीलदार सुरेश बगळे यांनीही गावकऱ्यांची समजूत घालून तणाव शांत केला. गुरुवारी माजी पालकमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही साहिलच्या कुटुंबाला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष वेधले. त्यातच आ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी यांनी मृताच्या कुटुंबीयांना भेट दिली. शुक्रवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुंबईहून परतताच माहुलीत पोहोचले. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह गावकऱ्यांनी पालकमंत्र्याना घटनेच्या पार्श्वभूमी कथन केली. त्यांनीही घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गावकऱ्यांच्या समस्या व मागण्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले. ही बाब मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन पोटे यांनी दिले. त्यानंतर ते यवतमाळ येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माहुलीच्या घटनेविषयी चर्चा करून गावकऱ्यांच्या भावना मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही घटनेच्या चौकशीचे आदेश अधिकाऱ्यांना देऊन दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पालकमंत्र्यांशी माहुलीतील संरपच संजय नागोने, उपसंरपंच अन्सार भाई, माजी संरपंच ज्योती ठाकरे आदींनी चर्चा केली.

Web Title: Mahuli does not have any children in the case of atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.