५०० गावांना न्याय, १,५०० मध्ये अन्याय; खरिपाची सुधारित पैसेवारी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 31, 2023 07:23 PM2023-10-31T19:23:06+5:302023-10-31T19:23:38+5:30

चार तालुक्यांत सरासरी उत्पादकतेमध्ये कमी

Justice to 500 villages, injustice to 1,500; Kharipa improved cash flow in amravati | ५०० गावांना न्याय, १,५०० मध्ये अन्याय; खरिपाची सुधारित पैसेवारी

५०० गावांना न्याय, १,५०० मध्ये अन्याय; खरिपाची सुधारित पैसेवारी

अमरावती : खरीप हंगामाची सद्यस्थिती दर्शविणारी सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाद्वारे मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती, तिवसा, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या चार तालुक्यांतील ४९४ गावांमध्ये ५० पैशांच्या आत तर उर्वरित दहा तालुक्यांत ५० पैशांच्या वर तर जिल्ह्याची सुधारित ५४ पैसेवारी दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे दहा तालुक्यातील १४९६ गावांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.

विशेष म्हणजे सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग सध्या सुरू आहेत. यामध्ये उतारा कमी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत दहा तालुक्यांत खरिपाच्या उत्तम स्थितीचे चित्र सुधारित पैसेवारीत उमटल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Web Title: Justice to 500 villages, injustice to 1,500; Kharipa improved cash flow in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.