किती हा बेडरपणा! पतीसोबत जाणाऱ्या महिलेच्या पाठीवरून फिरविला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:28 AM2018-01-23T00:28:21+5:302018-01-23T00:28:45+5:30

पतीसोबत दुचाकीहून जाणाऱ्या एका महिलेच्या पाठीवर काळीपिवळीतून जाणाऱ्या टोळक्यापैकी काहींनी चक्क हात फिरविला.

How big is this! Hands on the back of a woman accompanying her husband | किती हा बेडरपणा! पतीसोबत जाणाऱ्या महिलेच्या पाठीवरून फिरविला हात

किती हा बेडरपणा! पतीसोबत जाणाऱ्या महिलेच्या पाठीवरून फिरविला हात

Next
ठळक मुद्देहटकणाऱ्या पतीला मारहाण: लागोपाठ तीन घटना, रोडरोमिओंमुळे सामान्यजन दहशतीत, अंबानगरी असुरक्षित, पालकमंत्री सुस्त

अमरावती : पतीसोबत दुचाकीहून जाणाऱ्या एका महिलेच्या पाठीवर काळीपिवळीतून जाणाऱ्या टोळक्यापैकी काहींनी चक्क हात फिरविला. या कृत्याचा जाब विचारणाऱ्या तिच्या पतीला पुढच्या चौकात काळीपिवळीतील चौघांनी मारहाण केली. होय, चित्रपटात शोभावी अशी ही घटना आपल्या सुसंस्कृत अमरावतीत घडली. ही एकच नव्हे अशा स्वरुपाच्या लागोपाठ तीन घटना घडल्या. सततच्या या त्रासाने शहरातील आया-बहिणी जेरीस आल्या आहेत. ताफ्यात फिरणारे आपले पालकमंत्री मात्र त्यांच्या आगामी निवडणुकीच्या गणितांत व्यस्त आहेत.

चांदणी चौकातील एक २३ वर्षीय महिला तिच्या पतीसोबत दुचाकीने जात होती. ते दाम्पत्य पंचवटीकडून इर्विन चौकाकडे येत असताना एमएच २७ बीक्यू-००४० क्रमांकाची स्कूल व्हॅन त्यांच्या दुचाकीजवळ आली. चालकाशेजारी बसलेल्या इसमाने दुचाकीवर बसलेल्या त्या महिलेच्या पाठीवरून हात फिरविला. पतीने त्या टारगटांना हटकले. पुढे इर्विन चौकात सिग्नलवर दुचाकी थांबविली. त्यावेळी चारचाकीतील अज्ञातांनी ‘तुला काय करायचे, ते करून घे’ अशी धमकी दिली आणि खाली उतरून तीन ते चार अनोळखी इसमांनी महिलेसमोर पतीला मारहाण केली. हा प्रकार इर्विन चौकातील वाहतूक शाखेनजीक घडला. हादरलेल्या दाम्पत्याने गाडगेनगर पोलिसठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.

बडनेरा हद्दीतील अमरावती ते बडनेरा दरम्यान उड्डानपुलाखाली महिलेचा विनयभंग करण्यात आला. एक महिला तिच्या मैत्रिणीसोबत उड्डाणपुलाखालून कालीमाता नगराकडे पायी जात होती. दरम्यान, दुचाकीवर आलेले आरोपी इमराव बेग (३५, रा. जुनीवस्ती, बडनेरा) व त्याच्या दोन मित्रांनी महिलेला रस्त्यात अडवून विनयभंग केला. या घटनेच्या फिर्यादीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपीला अटक केली.

कोतवाली हद्दीतील एका मुलीचा सतत पाठलाग करीत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहित सतीश रामेकर (१९, रा. जयनगर) याला अटक केली आहे. रोहितने पीडितेच्या फेसबूकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. तिने ती स्वीकारताच मोबाइल क्रमांक मिळवून संवाद साधला. त्यानंतर तो तिला वारंवार फोन करायचा. पाठलागही करायचा. ही बाब तिने आई व काकांना सांगितल्यावर काही दिवस शांततेत गेलेत. मात्र, रविवारी पुन्हा त्याने पाठलाग केला.

Web Title: How big is this! Hands on the back of a woman accompanying her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.