भुलोरीत शॉर्टसर्कीटने घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:09 PM2019-02-09T23:09:33+5:302019-02-09T23:09:48+5:30

तालुक्यातील भुलोरी गावामध्ये विद्युत तारेच्या शॉर्टसर्कीटने आग लागली. त्यामध्ये घर व गोठा जळाला आहे.

The house of firefighters shortscrackers | भुलोरीत शॉर्टसर्कीटने घराला आग

भुलोरीत शॉर्टसर्कीटने घराला आग

Next
ठळक मुद्देगोठा जळाला : २०१३ मध्ये भस्मसात झाली होती १२ घरे

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील भुलोरी गावामध्ये विद्युत तारेच्या शॉर्टसर्कीटने आग लागली. त्यामध्ये घर व गोठा जळाला आहे.
भुलोरी गावातील नामदेव गंगाराम जावरकर हे गावालगत असलेल्या त्यांच्या शेतात चणा, गहू पिकाची निगराणी करीत असताना, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गावात असलेल्या त्यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारेचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ठिणगी उडाली आणि कोठ्यातील भुसा व गाई-म्हशीच्या चाऱ्याला आग लागली. या आगीने पेट घेत घरालाही कवेत घेतले. त्यात घरातील भांडीकुंडी जळाली, तर आणखी घरातील किरकोळ सामान जळून खाक झाले. ग्रामस्थांनी घरावर पाण्याचा मारा करून आग विझविली. आगीची माहिती मिळताच सरपंच गंगा जावरकर, माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. गावातील आगीची ही दुसरी घटना आहे. २०१३ मध्ये आगीमुळे गावातील बारा घरांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

 

 

Web Title: The house of firefighters shortscrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.