कृषिकेंद्रांचे नूतनीकरण आॅफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:47 AM2019-06-14T01:47:47+5:302019-06-14T01:48:14+5:30

जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्राचे रखडलेले परवाने आॅफलाइन देण्यात येणार आहेत. कृषिसेवा केंद्र संचालकांच्या दहा मागण्यांबाबत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्यासमक्ष चर्चा करताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे.

Farmer's Renewal Offline | कृषिकेंद्रांचे नूतनीकरण आॅफलाइन

कृषिकेंद्रांचे नूतनीकरण आॅफलाइन

Next
ठळक मुद्देजिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन : नगराध्यक्षांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्राचे रखडलेले परवाने आॅफलाइन देण्यात येणार आहेत. कृषिसेवा केंद्र संचालकांच्या दहा मागण्यांबाबत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्यासमक्ष चर्चा करताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे.
कृषिसेवा केंद्राच्या समस्या निकाली निघाव्यात म्हणून धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी बुधवारी जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची भेट घेतली. कृषिसेवा केंद्रांचे परवाना नूतनीकरणाचे काम संगणकीकरणाचे संकेत स्थळ बंद असल्यामुळे दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या हंगामात बियाणे व खताची विक्री कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांसाठी आॅफलाइन सेवा गृहित धरण्यात येणार असून, त्यांना नूतनीकरणाचे परवाने देण्यात येणार असल्याचे खर्चान यांनी स्पष्ट केले.
कृषिसेवा संचालकांसाठी कृषी कोर्स बंधनकारक करण्यात आले. ज्येष्ठ कृषिसेवा केंद्र संचालकांना त्यातून वगळावे, अशी विनंती करण्यात आली. गोडाऊनच्या परवानगीसाठी अडचणी दूर करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले. कृषिसेवा केंद्रातून पीजीआरची विक्री करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी प्रताप अडसड यांना सांगितले.
कृषिसेवा केंद्राच्या संचालकांच्या वारसांना परवाना तसेच अवैध खत, बियाणे विक्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी करण्यात आली. पुरविण्यात आलेल्या पॉस मशीन नादुरुस्त झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक स्तरावर ही अडचण दूर करणार असल्याची माहिती खर्चान यांनी दिली. यावेळी आत्माचे प्रदेश सदस्य नितीन मेंडुले, कृषी साहित्य विक्रेता संघाचे राजेश अग्रवाल, वीरेंद्र शर्मा, तालुक्यातील कृषिकेंद्र संचालक, सुजित मुंधडा, गणेश राजनकर, दिनेश वैरागडे, चांदूर रेल्वे येथील कृषिकेंद्र संचालक बाळू टावरी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषिकेंद्र संचालक तथा तालुका पदाधिकारी प्रवीण खांदेल यांची उपस्थिती होती.

Web Title: Farmer's Renewal Offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.