पन्नी वेचणाऱ्या बादशाहचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:14 PM2018-01-14T23:14:34+5:302018-01-14T23:15:36+5:30

Doubtful death of the emperor who is fining the foil | पन्नी वेचणाऱ्या बादशाहचा संशयास्पद मृत्यू

पन्नी वेचणाऱ्या बादशाहचा संशयास्पद मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देहत्या की अपघात? : आशियाड कॉलनीतील घटना

आॅनलाईन लोकमत
अमरावती : बादशाह नावाने ओळखले जाणाऱ्या सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ नामदेव भगत (५०,रा. रमाबाई आंबेडकरनगर) याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने रविवारी सकाळी आशियाड कॉलनीत खळबळ उडाली. सिद्धू भगत याच्या डोक्याला गंभीर जखमा दिसून आल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे. मात्र, पायºयावरून घसरून पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे सिद्धू भगतचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे.
सिद्धू भगत हा रमाबाई आंबेडकर नगरात बहिणीच्या घरी राहत होता. तो प्लास्टिक पन्नी वेचून जीवनचक्र चालवित होता. आशियाड कॉलनीतील एका कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात तो वास्तव्य करीत होता. त्याला बादशाह नावाने केल्यामुळे त्या परिसरातील नागरिक ओळखत होते. रविवारी सकाळी सिद्धू कॉम्प्लेक्सच्या पायºयाजवळ नग्न व मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यातून रक्त निघत असल्याचे पाहून त्याची हत्या केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. गाडगेनगर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे तपासणी केली असता श्वान त्याच ठिकाणी घुटमळला. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली. सिद्धू रोज मद्य सेवन करीत होता. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूने जखमा असल्यामुळे तो पायऱ्यांवरून घसरून पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मध्यरात्री सिद्धूची आरडाओरड
शनिवारी रात्री २.३० च्या सुमारास सिद्धू आरडाओरडा करीत असल्याचे काही नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या कॉम्प्लेक्समध्ये रात्रीच्या वेळी मद्यपी दारू पीत असल्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे मध्यरात्रीदरम्यान सिद्धूवर हल्ला झाला असावा, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्हीची पाहणी असता मध्यरात्रीदरम्यान कुणीच कॉम्प्लेक्सच्या आवारात नसल्याचे आढळून आले.

इसमाच्या डोक्याला मागून मार आहे. तो पायऱ्यावरून घसरून पडल्याची शक्यता आहे. आकस्मिक मृत्युची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

Web Title: Doubtful death of the emperor who is fining the foil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.