जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:08 PM2018-09-08T22:08:00+5:302018-09-08T22:08:15+5:30

लोकमत बाल विकास मंच व एडिफाय इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा पार पडली.

District-level rip skipping competition | जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा

जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देरूधीरा जैन सर्वोत्कृष्ट : एसओएसला सहभागिता पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकमत बाल विकास मंच व एडिफाय इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा पार पडली.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्कॉलर्स कॉन्व्हेंट, स्कूल आॅफ स्कॉलर्स, होलीक्रॉस बडनेरा, एकवीरा स्कूल - दर्यापूर, पर्ल आॅयस्टर - दर्यापूर, स्पिरीट स्पोर्ट्स क्लब - दर्यापूर, मोहनलाल सामरा, एडिफाय स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही स्पर्धा ५ ते १० आणि १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलामुलींमध्ये पार पडली. प्रत्येक गटातील तीन मुले व तीन मुली यांना एकूण १२ पदके प्रदान करण्यात आली, तर प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. निर्भय ठाकरे या साडेचार वर्षाच्या चिमुकल्याला उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. स्कूल आॅफ स्कॉलर्सला उत्कृष्ट सहभागिता पुरस्कार देण्यात आला. रूधीरा जैन सर्वोत्कृष्ट स्पर्धक म्हणून रोख बक्षीस व ट्रॉफीची मानकरी ठरली. मनोज ठाकरे, भरत मुंडे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

लोकमत बाल विकास मंच, एडीफाय, जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन
‘अ’ गट मुलांमध्ये प्रसमित कोहाळे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), वेदांत मोर्शे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), सोहम गादे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), मोहनीश चांदवानी (एडिपाय स्कूल), ‘अ’ गट मुलींंमध्ये पूर्वा काळे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), कृतिका आमटे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), नभा देशमुख (स्कूल आॅफ स्कॉलर्स), इशिता वढाल (एकवीरा स्कूल दर्यापूर), ‘ब’ गट मुलांमध्ये इशांत राजे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), असित मंडे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), हेमांग कोटीकर (विश्वभारती पब्लिक स्कूल), अथर्व पाचडे (पर्ल आॅयस्टर, दर्यापूर), ‘ब’ गट मुलींमध्ये रूधीरा जैन (स्कूल आॅफ स्कॉलर्स), जसप्रीत कौर (होलीक्रॉस, बडनेरा), सिंड्रेला डोंगरदिवे (होलीक्रॉस, बडनेरा), गार्गी ठाकरे (एडिफाय स्कूल) यांनी गटांमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावले.

Web Title: District-level rip skipping competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.