आटणारे जलस्रोत वन्यप्राण्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:54 PM2019-02-18T22:54:55+5:302019-02-18T22:55:24+5:30

यंदा वणव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत वन्य प्राण्यांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Dangerous water resources are among wild animals | आटणारे जलस्रोत वन्यप्राण्यांच्या मुळावर

आटणारे जलस्रोत वन्यप्राण्यांच्या मुळावर

Next
ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल : वन्यप्राण्यांची गावांकडे धाव, डबक्यांवर तहान

अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : यंदा वणव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत वन्य प्राण्यांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
वणव्याची धग सोसवणारी नसल्याने वन्यप्राणी वेगाने जंगलाबाहेर पडण्यास सुरूवात होते. जंगलातील जलस्त्रोत आटल्याने हरणांवर त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम होणार आहे. पोहरा जंगलात हरिणांची संख्या सर्वाधिक असून त्यांना वणव्याची भीती आहे. उन्हाळ्यापुर्वीच जलस्त्रोत आटू लागल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे यावर्षी पोहरा-चिरोडी जंगलात नैसर्गिक पाणवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. वन्यप्राणी पाण्यासाठी वनक्षेत्राबाहेर जाऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे नैसर्गिक स्त्रोत पूर्णपणे आटले. पाणवठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहायचे. ते देखिल आता पूर्णपणे आटलेले आहेत. कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. त्याचा थोडा आधार झाला पण तरीही तो पुरेसा नाही कारण काही पाणवठे पुन्हा आटले आहेत. वन्यप्राण्यांच्या ठिकाणानुसार पाणवठे असायला हवेत, मात्र तशी व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी जंगलाबाहेर पडण्याची भीती आहे.
जंगलाबाहेर भटकंती
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगलातील वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने सिमेंटचे चार पाणवठयांची निर्मिती केली आहे. मात्र त्या पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची तहान भागणे कठीण झाल्याने वन्यप्राणी जंगलाशेजारच्या गावपरिसरातील डबक्यात तृष्णा भागवित आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच त्यांची जंगलाबाहेर भटकंती सुरु झाली आहे. सोमवारी वरूडानजिक हे चित्र दिसले.

Web Title: Dangerous water resources are among wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.