स्वच्छ सर्वेक्षणापश्चात ‘संशयकल्लोळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 01:23 AM2017-01-30T01:23:21+5:302017-01-30T01:23:21+5:30

शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला

After the 'clean survey', 'suspicious' | स्वच्छ सर्वेक्षणापश्चात ‘संशयकल्लोळ’

स्वच्छ सर्वेक्षणापश्चात ‘संशयकल्लोळ’

Next

निकालाकडे लक्ष : लाचखोरीचे गालबोट, महापालिका यंत्रणेला होणार विचारणा
अमरावती : शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने सर्वेक्षणापश्चात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या लाचखोर सर्वेक्षण पथकाच्या कारनाम्याचा अहवाल नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांसह केंद्रसरकारकडे पोहोचता करण्यात आला आहे. औरंगाबादेपूर्वी यापथकाने ज्या शहरांची तपासणी केली तेथे असा काही प्रकार घडला का, याबाबत चाचपणीचे संकेत मिळाल्याने संशयाला वाव मिळाला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ अंतर्गत शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन व अन्य अनुषंगिक बाबी तपासणीसाठी ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’चे त्रिसदस्यीय पथक १७ ते १९ जानेवारीदरम्यान शहरात होते. यापथकात ‘चिफ असेसर’ चारूदत्त पाठक यांच्यासह विजय जोशी आणि गोविंद घिमिर यांचा समावेश होता.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ५०० शहरांचे स्वच्छताविषयक मूल्यांकन केले जात आहे. ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ शहराची तपासणी करण्याचे नियोजन ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ने केले आहे. कौन्सिलने सूरत येथिल ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीला विविध शहरांनी केलेल्या कामांचे मूल्यमापन करून संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यानुसार पाठक, जोशी आणि गिरामे अमरावतीत आले होते. १९ जानेवारीला यापथकातील चारूदत्त पाठक वगळता विजय जोशी आणि गोविंद घिमिर हे अमरावतीची तपासणी आटोपून औरंगाबादला गेले. तेथे जोशी आणि घिमिर यांच्यासह ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीचे वरिष्ठ सहायक शैलेश बंजानिया यांनी औरंगाबाद शहर स्वच्छतेचे मूल्यांकन केले. ‘निगेटिव्ह मार्किंग’चा धाक दाखवून स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या २०मध्ये यायचे असेल तर अडीच लाख रूपये द्यावे लागतील, अशी थेट मागणी बंजानिया यांनी स्वच्छता अभिायनाच्या प्रमुख जयश्री कुलकर्णी यांचेकडे केली.

प्रकरण पीएमओंकडे
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण आणि मूल्यमापनाच्या कामातील लाचखोरीच्या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. हेप्रकरण आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले असून त्यात कठोर कारवाईचे संकेत आहेत. स्वच्छ अभियान मिशनचे प्रमुख आणि केंद्र सरकारचे सहसचिव प्रवीण प्रकाश यांनीही याप्रकाराची दखल घेतली आहे. यापथकातील दोघांनी औरंगाबादपूर्वी अमरावती शहराचे मूल्यांकन केल्याने त्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.

Web Title: After the 'clean survey', 'suspicious'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.