जलसंधारणाच्या कामांना २० गावांमध्ये वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:35 PM2019-05-19T13:35:39+5:302019-05-19T13:35:43+5:30

तेल्हारा : पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये वेग आला आहे.

Water conservation work spread in 20 villages | जलसंधारणाच्या कामांना २० गावांमध्ये वेग

जलसंधारणाच्या कामांना २० गावांमध्ये वेग

Next

- सत्यशील सावरकर  
 
तेल्हारा : पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये वेग आला आहे. या गावातील ग्रामस्थ विविध उपक्रम राबवून श्रमदान करीत आहेत. यावर्षी स्पर्धेची मुदत वाढवून २७ मे करण्यात आली आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये या वर्षी तेल्हारा तालुक्यातील ६१ गावांनी आपले गाव पाणीदार करण्याकरिता सहभाग घेतला आहे. अगदी पाहिला प्रशिक्षणाचा टप्पा पार पडत असताना २४ सरपंच, ५ उपसरपंच आणि २९ ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. दुष्काळमुक्त तेल्हारा करण्यासाठी ७ तारखेला रात्री १२ वाजता विविध गावात नानाविध प्रकारे श्रमदान सुरू करण्यात आले.
यामध्ये सौदळा येथे तृतीयपंथीयांनी श्रमदानाची सुरुवात केली ७ एप्रिलचा रात्री तालुक्यातील एकूण ५ गावांनी रात्री १२ वाजता श्रमदान केले, कुठे एकटे असणारे निवारा येथील श्रीकांत यांनी गाव पाणीदार करण्यासाठी एकापासून श्रमदानाला सुरुवात केली तर मनब्दा येथे केक कापून श्रमदानाची सुरुवात करण्यात आली आणि आनंद साजरा केला गेला. सद्यसथितीत तालुक्यात जवळपास २० गावांमध्ये अखंड श्रमदान सुरू आहे. या सहभागी असलेल्या गावांमध्ये जलसंधारणाचे प्रामुख्याने सलग समतल चर, खोल सलग समतल चर, शेततळे, कंपार्टमेंट बांध, ढाळीचे बांध, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण हे उपचार घेण्यात आले आहेत. सोबतच माती परीक्षण आणि आगपेटीमुक्त शिवार आणि जलबचत यावरसुद्धा भर देण्यात आला आहे. डोंगराळ भागातील झरी बाजार, मोयपानि, चंदनपूर आणि सपाट भागातील कोठा, मनब्दा, दहिगाव, भंबेरी, आदी गावांमध्ये बांधबंदिस्तीवरचे उपचार घेण्यात आलेले आहेत. ८ एप्रिलपासून या कालावधीत १ व २ मे रोजी महाश्रमदान झाले. त्यामध्ये विविध संघटना, जलमित्रानी श्रमदान केले. यामुळे तालुक्यात पाणी फाउंडेशनचे तुफान दिसत आहे. दरम्यान, बांधावर नावीनपूर्ण उपक्रम करण्यात आले.
बांधावर राबवतात विविध उपक्रम
श्रमदान करीत असलेल्या बांधावरच विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. बांधावर लग्न लावण्यात आले, श्रमदान करण्यासाठी आलेल्या महिलांना सौदळा आणि मनब्दा येथे साडी-चोळी वाटप, मनब्दा येथील सीमाताईचे दररोज अकोला येथून माहेर मनब्दा येथे श्रमदान करणे व त्यांच्या या कामाला पाहून त्यांच्यासोबत डीएड करणाऱ्या मित्रांनी आपल्या परिवारासह श्रमदान करून मदत करणे, चंदनपूर येथे हंडा कळशी लग्न, मामाचे पत्र, अडगाव येथे जयंती उपक्रम असे एक ना अनेक विविध उपक्रम राबवून सध्या श्रमदान सुरू आहे. ‘माती अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम करून जलसंधारण कामे होत असल्याने पुढील पावसाचे नियोजन सुरू आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन चमू, जलमित्रांचे मोठे योगदान आहे.

Web Title: Water conservation work spread in 20 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.