लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जुने शहरातील राजराजेश्‍वर मंदिराच्या मागे असलेल्या परिसरात अज्ञात इसमांनी दोन दुचाक्या जाळल्याची घटना सोमवारी पहाटे उजेडात आली. याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
राजराजेश्‍वर मंदिराच्या पाठीमागील भागातील रहिवासी नरेंद्र पवनीकर यांनी त्यांच्या अँक्टीव्हा आणि डीस्कव्हर या दोन दुचाक्या रविवारी रात्री घरासमोर ठेवल्या होत्या. या दोन्ही दुचाक्या अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून जाळल्या असून, हा प्रकार सोमवारी पहाटे उजेडात आला. या प्रकरणाची माहिती जुने शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून दुचाक्या जाळणार्‍यांचा शोध सुरू केला आहे.