अकोल्यात तीन महिलांकडून मुद्देमाल हस्तगत; महिला नांदेड येथील रहिवासी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:33 PM2017-12-25T23:33:07+5:302017-12-25T23:34:42+5:30

अकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्‍या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे.

Three women in Akola; Women of Nanded! | अकोल्यात तीन महिलांकडून मुद्देमाल हस्तगत; महिला नांदेड येथील रहिवासी!

अकोल्यात तीन महिलांकडून मुद्देमाल हस्तगत; महिला नांदेड येथील रहिवासी!

Next
ठळक मुद्देअनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती खदान पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्‍या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे.
मलकापूर येथील रहिवासी शीला संभाजी हटकरे ही महिला ३0 नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून ऑटोने गांधी चौककडे जात होती. यावेळी इन्कम टॅक्स चौकातून तीन महिला याच ऑटोत बसल्या. या तीनही महिलांनी मोठय़ा शिताफीने हटकरे यांच्याकडील ३५ गॅ्रम सोन्याची सोनसाखळी लंपास केली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी तपास सुरू केला असताना हटकरे यांनी सांगितलेल्या वर्णनाच्या तीन महिला कौलखेड चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नितीन मगर यांनी खदान पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तीनही महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या महिलांकडून खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी १0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या महिला मराठवाड्यातील नांदेड येथील रहिवासी असून, त्यांनी अनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Three women in Akola; Women of Nanded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.