ट्रक-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:38 PM2019-01-14T12:38:39+5:302019-01-14T12:38:49+5:30

अकोला : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बीएससी अ‍ॅग्रीकल्चरचे शिक्षण घेत असलेला तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्याचा दुचाकीने जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री महाबीजनजीक असलेल्या पुलावर घडली.

Student killed in truck-bike accident | ट्रक-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थी ठार

ट्रक-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थी ठार

Next


अकोला : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बीएससी अ‍ॅग्रीकल्चरचे शिक्षण घेत असलेला तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्याचा दुचाकीने जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री महाबीजनजीक असलेल्या पुलावर घडली.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी ऋषिकेश साखरे हा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बीएससीच्या अंतिम वर्षाला आहे. रविवारी सायंकाळी तो दुचाकीने जात असताना त्याला एका ट्रकने धडक दिल्याची माहिती आहे. यामध्ये ऋषिकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन आणि खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकला ताब्यात घेतले; मात्र ट्रक चालकाने सदर अपघातात दोन दुचाकींमध्ये झाल्याचे सांगितले आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली होती.

 

Web Title: Student killed in truck-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.