शिवशाहीची ट्रकला मागून धडक; कुणीही जखमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:02 PM2018-11-19T12:02:40+5:302018-11-19T12:03:29+5:30

कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक - नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाहीने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली.

Shivaishi and truck accident; Nobody is injured | शिवशाहीची ट्रकला मागून धडक; कुणीही जखमी नाही

शिवशाहीची ट्रकला मागून धडक; कुणीही जखमी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक - नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाहीने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, मात्र शिवशाही व ट्रकचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.         जालनावरून नागपूरकडे जाणारी शिवशाही बस क्र.एम एच ०२ ई आर ४०७७ ने अकोल्यावरून अमरावतीकडे पोती वाहून नेणारा पंचर स्थितीत रोडच्या कडेला उभा असलेला आयशर ट्रक क्र. एम एच २१ एक्स ११३५ ला हा मागून जबर धडक दिल्याने शिवशाही व ट्रक मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच कुरूम चौकीच्या पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली.

Web Title: Shivaishi and truck accident; Nobody is injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.