वाशिममध्ये शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 02:00 PM2018-09-29T14:00:30+5:302018-09-29T14:02:08+5:30

वाशिम : जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना शनिवार, २९ सप्टेंबरपासून स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर सुरूवात झाली.

School Playground competition in Washim! | वाशिममध्ये शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरूवात!

वाशिममध्ये शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरूवात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना शनिवार, २९ सप्टेंबरपासून स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर सुरूवात झाली. यानिमित्त १४ वर्षे वयोगटातील मुले-मुलांची धावण्याची शर्यत घेण्यात आली. याशिवाय इतरही स्पर्धा पार पडल्या. 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत आयोजित शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील शाळांमध्ये शिकणारे खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शनिवारी सकाळी रितसर मैदानाचे पुजन करून स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला.

Web Title: School Playground competition in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम