बढती नाकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:06 PM2018-12-31T12:06:05+5:302018-12-31T12:06:14+5:30

बढती नाकारून संबंधित जागेवर रुजू होण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने १९ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे.

The revised ST employees' pay scale will be canceled | बढती नाकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी होणार रद्द

बढती नाकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी होणार रद्द

Next

वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित सेवा विनियमानुसार कर्मचाऱ्यांसाठी खात्यांतर्गत बढती परीक्षेचे घेण्यात येते आणि उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना बढती देऊन विविध ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात येते; परंतु संबंधित कर्मचारी बढतीनंतर बदलीच्या ठिकाणी जाण्यास इच्छूक नसतात. या पृष्ठभूमीवर बढती नाकारून संबंधित जागेवर रुजू होण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने १९ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे.
एसटीच्या वर्ग ३ व वर्ग ४ या प्रवर्गातील सर्वच कर्मचाºयांना बढतीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित कर्मचाºयांची बढती परिक्षा घेण्यात येते. परिक्षा उर्त्तीण झाल्यानंतर त्यांना बढतीपदी नियुक्ती देण्यात येते; परंतु निवड श्रेणी, श्रेणीकरणाचा लाभ दिल्याने कर्मचारी बढतीच्या ठिकाणी जाण्यास उत्सूक नसतात, असे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे, तसेच काही विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाºयांना ठराविक सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर निवडश्रेणी दिली जाते. ज्यामध्ये लगतच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देऊन वेतननिश्चिती केली जाते. निवडश्रेणी दिल्यानंतर त्या कर्मचाºयाची अन्यत्र बदली केली जात नाही. निवडश्रेणी, श्रेणीकरण मिळालेल्या कर्मचाºयासह अन्यत्र बदली न होता बढतीचे पद वगळता बढतीबाबतचे सर्व आर्थिक फायदे मिळतात. त्यामुळे बरेच कर्मचारी बढतीवर बदलीच्या ठिकाणी हजर होत नाहित. परिणामी महामंडळाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळाने जे कर्मचारी बढतीवर बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत, अशा कर्मचाºयांची पदग्रहण अवधी संपल्याच्या दुसºया दिवसापासून नियमित बढली रद्द करून त्यांच्या सध्याच्या लगतच्या पदात देण्यात आलेली निवड श्रेणी, श्रेणीकरण काढून घेण्यासह धारण केलेल्या पदावर वेतनश्रेणीत नव्याने वेतननिश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी कामगार संघटनेचा विरोध
एसटी महामंडळाने बढतीनंतर मिळणाºया पदावर बदलीने जाण्यास इच्छूक नसलेल्या एसटी कर्मचाºयांची वेतनश्रेणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. एसटी कामगार करारातील तरतुदीचा भंग करणारा हा निर्णय असल्याचा युक्तीवाद महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आला असून, हा निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणीही केली आहे. या संदर्भात संघटनेकडून एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना २१ डिसेंबर रोजी पत्रही पाठविण्यात आले आहे.

Web Title: The revised ST employees' pay scale will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.