राज्यात केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:22 PM2019-01-29T12:22:14+5:302019-01-29T12:22:22+5:30

अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे.

Rabbi crops only 60% of the area | राज्यात केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पिके

राज्यात केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पिके

Next

अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. पावसाची अनिश्चितता,कमी ओलावा याचा परिणाम पेरणीवर झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर म्हणजेच ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सद्या रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत असून,गहू पीक फुटवे ते आेंबींच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा,बोंडे तर काही ठिकाणी बोंडे परिपक्चतेच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक घाटे धरणे,परिपक्चता तर काही ठिकाणी काढणीला आला आहे. जवस पीक सद्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.राज्यात गहू ५ लाख ६६ हजार ४४७ हेक्टर,मका १ लाख १५ हजार ५११ हेक्टर, इतर तृण धान्य १२ हजार ५६१ मिळून १९ लाख ४१ हजार ६४ तसेच एकूण रब्बी कडधान्ये मिळून १४ लाख १९ हजार ६५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकामध्ये करडई १८००५, जवस ७,६१८,तीळ ४९५,सुर्यफूल ३,५२९ मिळून,इतर तेलबिया ४,८८३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यात हरभरा ६६ टक्के, ज्वारी क्षेत्र ७१ टक्क आहे.
दरम्यान, हरभºयावरील घाटेअळीवर नियंत्रण करण्यासाठी ५,८११ गावात सर्वेक्षण करण्यात आले असून, यात ९६ गावात घाटेअळी १८९ गावात मर या किड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी राज्यातील १८ लाख १४ हजार शेतकºयांना कृषी विभागामार्फत एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Rabbi crops only 60% of the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.