तुरीची आॅनलाइन नोंदणी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 06:12 PM2018-12-21T18:12:01+5:302018-12-21T18:12:09+5:30

अकोला: तुरीची खरेदी करण्यासाठी यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; परंतु बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असल्याने शासनाने प्रथम आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे,

online registration for purchase of pulses needed | तुरीची आॅनलाइन नोंदणी करण्याची गरज

तुरीची आॅनलाइन नोंदणी करण्याची गरज

googlenewsNext


अकोला: तुरीची खरेदी करण्यासाठी यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; परंतु बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असल्याने शासनाने प्रथम आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही लूट होण्याची शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी १०० क्ंिवटल तुरीची आवक झाली.
तुरीला यावर्षी ५,६७५ रू पये हमी दर जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी तुरीचे उत्पादन बºयापैकी होण्याची शक्यता आहे. काही भागातून नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे.परंतु तुरीचे केंद्र सुरू करण्याचे प्र्रस्ताव सहकारी संस्थाकडून मागविण्यात आले आहेत.ही केंद्र सुरू होईपर्यंत तरी शेतकºयांना बाजारात तूर विकावी लागत आहे. बाजारात हमीपेक्षाही कमी दराने बाजारात ही तूर खरेदी केली जात असल्याने शासनाने आॅनलाइन नोंदणी करण्याची गरज आहे.
मागीलवर्षी तुरीचे हमीदर व बोनस मिळून शेतकºयांना प्रतिक्विंटल ५०५० रुपये मिळाले पण तुर खरेदीला प्रंचड विलंब झाला, प्रतवारीचे निकषही लावण्यात आले तसेच आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकºयांची चांगलीच धावपळ झाली.यावर्षी शेतकºयांना अशा परिस्थितीचा सामना आतापासूनच करावा लागत आहे. बाजारात सद्या नवीन तुरीला प्रतिक्ंिवटल ४,८०० ते ५ हजार रू पये दर मिळत आहेत असे असले तरी हे दर हमीदरापेक्षा ६०० ते ८०० रू पयाने कमी आहेत. पण व्यापारी सध्या निकष न लावता तुरीची थेट खेरदी करीत असल्याने शेतकºयांना दिलासादायक ठरत आहे. फेडरेशन एफएक्यू प्रतीच्या तुरीला हे दर देणार आहे. त्यामध्ये तुरीच्या आर्द्रतेची अट आहे. शिवाय ज्या सहकारी संस्थाना खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीच्या अटी टाकण्यात आल्या आहेत. असे असले तरी शेतकरी शासकीय तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी तूर विक्रीची रोकड थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी ३३८ क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यात आली तसेच नवीन तूर जवळपास १०० क्ंिवटल खरेदी करण्यात आली. शेतकरी आर्थिक अडचनीत असल्याने त्यानांही तूर विकण्यावाचून पर्याय नसल्याने येत्या आठवड्यात तुरीची आवक वाढणार असल्याने व्यापारी तूर खरेदी करण्यास सज्ज आहे.

-बाजारात तुरीची आवक सुरू झाल्याने शासनाने तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे. अगोदर आॅनलाइन नोंदणी सुरू करावी,म्हणजे शेतकºयांची धावपळ होणार नाही.
मनोज तायडे,संयोजक,शेतकरी जागर मंच,अकोला.

 

Web Title: online registration for purchase of pulses needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.