डाळीनंतर कांद्याने रडवले!

By admin | Published: August 26, 2015 01:45 AM2015-08-26T01:45:57+5:302015-08-26T01:45:57+5:30

पालेभाज्यांचे भाव भिडले गगनाला!

The onions after the pulse cry! | डाळीनंतर कांद्याने रडवले!

डाळीनंतर कांद्याने रडवले!

Next

अकोला : डाळी, कांदा भडकला असताना, पालेभाज्यांचे भावही गगनाला भिडल्याने सामान्य, गोरगरीब जनता या महागाईत भरडली जात आहे. तूर डाळ बाजारात १२0 रुपये किलोच्यावर पोहोचली असून, कांद्यासह भाज्यांचे किरकोळ भाव १00 रुपये प्रतिकिलोने पार केले आहेत. सलग पाच वर्षांपासून जिल्हय़ात पूरक पाऊस होत नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत असल्याने अकोलाच्या भाजीबाजारात पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक व इतर जिल्हय़ातील भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कांदा उत्पादन घटल्याने कांद्याचे भाव सध्या कडाडले असून, सर्व डाळींचे भावही वधारले आहेत आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या, गोरगरीब जनतेच्या जेवणात या वस्तू बाद होताना दिसत आहेत. भाजीबाराजारात टोमॅटोचे प्रती दहा किलोचे दर ४00 रुपये आहेत; पण हेच टोमॅटो किरकोळ बाजारात ६0 रुपये प्रतिकिलोच्यावर आहेत. किरकोळ बाजारात फुलगोबी ६0 रुपये प्रतिकिलो, तर भेंडी, बरबटी, मेथीचे दरही ६0 च्यावरच आहेत. मागील दोन महिन्यात संभाराचे भाव २00 रुपये किलोच्यावर गेले होते. ते आता ठोक बाजारात ५0 तर किरकोळ बाजारात ६0 रुपयाच्यावरच दर आहेत. लवंगी मिरचीचे दरही वाढलेले आहेत. इतरही सर्वच भाज्या कडाडल्या आहेत. मध्यम लसणाचे भाव ४८00 रुपये प्रतिक्विंटल पोहोचले आहेत. हे ठोक दर असल्याने किरकोळ बाजारातील दर १00 रुपयांपेक्षा अधिक आहे. धान्य बाजारात आजमितीस तूर डाळीचे घाऊक दर हे दहा ते बारा हजार रु. क्विंटलपर्यंत पोहाचले असून, मूग डाळ ९ ते १0 हजार क्विंटलच्यावर सरकत आहे. उडदाच्या डाळीचे भाव १0 हजारापर्यंत गेले असून, उडीद मोगरने साडेहजार रुपये क्विंटल्यावर पल्ला गाठला आहे. मठ आणि मठ मोगरचे दर ९ हजारापर्यंत पोहाचत आहेत. हरभरा डाळदेखील सहा हजाराच्यावर गेली आहे. सर्व गव्हाचे दर २१00 ते २८00 रुपये प्रतिक्विंटल असून, दादर ज्वारी २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर आहेत. किरकोळ बाजारात दादर ज्वारीचे दर ३५ रुपये किलोच्यावर आहेत. या सर्व डाळी धान्याचे दर हे ठोक असून, किरकोळ बाजारातील दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

Web Title: The onions after the pulse cry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.