विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:22 AM2018-03-14T02:22:56+5:302018-03-14T02:22:56+5:30

मूर्तिजापूर(अकोला) : येथील एका सार्वजनिक विहिरीमधील गाळ उपसण्याचे काम १३ मार्च रोजी सुरू असताना विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुस-या इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून अकोल्यास हलविण्यात आले.

One killed due to breathlessness in the well, one serious | विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर

विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर

Next
ठळक मुद्देविहिरीतील गाळ उपसताना घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर(अकोला) : येथील एका सार्वजनिक विहिरीमधील गाळ उपसण्याचे काम १३ मार्च रोजी सुरू असताना विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुस-या इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून अकोल्यास हलविण्यात आले.
 अशा एका विहिरीमधील गाळ उपसताना विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मुत्यूु झाला तर एक इसम अत्यवस्थ असल्याची घटना १३ मार्च रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्याचे काम लोकवर्गणीतून सुरू होते. 
शहरात उन्हाळा लागताच पिण््याच््या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकवर्गणीतून शहरातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याचे काम लोक करीत आहेत. अशाचप्रकारे १३ मार्च रोजी शहरातील आठवडी बाजारातील हनुमान व्यायाम शाळेमागील विहिरीतील गाळ लोकवर्गणीतून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू होते. यावेळी धोत्रा शिंदे येथील काही मजूर विहिरीतील गाळ काढण्याचे काम करीत होते. 
या दरम्यान मूर्तिजापूरजवळील धोत्रा शिंदे येथील रहिवासी असलेल्या शेख इस्माइल शेख इब्राहिम (३५) यांचा श्वास गुदमरल्याने तो अचानक खाली पडला. 
त्यानंतर त्याच्यासोबत विहिरीत काम करीत असलेल्या धोत्रा शिंदे येथील राहुल लोखंडे (४५) यालाही अस्वस्थ वाटू लागले.  त्या दोघांनाही तातडीने वर काढून स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉकटरांनी शेख इस्माइल याला मृत  घोषित केले. राहुल लोखंडेवर प्रथमोपचार करून त्याला तातडीने अकोला येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती हे वृत्त लिहिपर्यंत अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.  
विहिरीच्या वर असणाºया इसमांनी दोघांना वर काढून ल.दे.सा.रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती  मिळताच समाजसेवक नासिरोद्दीन बद्रोद्दीन यांनी तसेच काही नगरसेवकांनी रुग्णालयात धाव घेऊन गंभीर असलेल्या राहुल लोखंडेला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शेख इस्माइल शेख इब्राहीम यांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: One killed due to breathlessness in the well, one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला