अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना द्या गोवर, रुबेला लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:58 PM2018-11-24T17:58:35+5:302018-11-24T17:58:54+5:30

अकोला : लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते १५ वर्षांआतील प्रत्येक बालकाला रुबेला व गोवरची दुहेरी लस द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी केले.

not to believe in rumors; Give children rubella vaccine! | अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना द्या गोवर, रुबेला लस!

अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना द्या गोवर, रुबेला लस!

Next

अकोला : लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते १५ वर्षांआतील प्रत्येक बालकाला रुबेला व गोवरची दुहेरी लस द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी केले. ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याने यासंदर्भात पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.
२७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रुबेला व गोवर लसीकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख व विलास खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यंदा पहिल्यांदाच नऊ महिने ते १५ वर्षांआतील बालकांना २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेलाचे दुहेरी लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख १२ हजार ७२६ बालकांना, तर मनपा क्षेत्रात १ लाख १५ हजार ४१६ बालकांना लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील १ हजार ६१८ शाळांमध्ये, तर महापालिका कार्यक्षेत्रातील १९५ शाळा आणि ८३४ अंगणवाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. रुबेला आणि गोवर हे विषाणूपासून होणारे आजार आहेत. गोवर या आजारात रुग्णास ताप, पुरळ, सर्दी, खोकला किंवा डोळे लाल होणे यापैकी किमान एक लक्षण दिसून येते. गोवर झालेल्या रुग्णास न्युमोनिया, अतिसार किंवा मेंदूज्वर यापैकी आजार होऊ शकतात. उपचार न मिळाल्यास रु ग्णाचा मृत्यू होऊ शकतो. भारतात दरवर्षी जवळपास ५० हजार रुग्णांचा या आजाराने मृत्यू होतो, तर रुबेला या आजारामुळे गर्भवतींना गर्भपात होऊ शकतो. जन्माला आलेल्या बाळास मोतीबिंदू, बहिरेपणा, वाढ खुंटणे, यकृत, प्लिहाचे आजार, हृदयविकार आदी आजार होण्याची शक्यता असते. रुबेलाचा धोका गर्भवतींनाच असला, तरी ही लस केवळ मुलींनाच नाही, तर मुलांनाही दिली जाते.


लसीकरणापासून बाळ पूर्णत: सुरक्षित
एशियाड व राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांना प्रशिक्षण
रिअ‍ॅक्शन झाल्यास तत्काळ उपचार सुविधा
लसीकरणानंतर डाव्या हाताला लावणार शाई व प्रमाणपत्र वितरण
लसीकरणानंतर ३० मिनिटे बालकांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल.

 

Web Title: not to believe in rumors; Give children rubella vaccine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.