नेर-धामणा बॅरेज : भूमीगत जलवाहिनीच्या कामाची किंमत गेली ७० वरून दिडशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:51 PM2018-03-24T15:51:44+5:302018-03-24T15:51:44+5:30

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.

Ner-Dhama Barrage: The cost of the barrage goes on 150 crore | नेर-धामणा बॅरेज : भूमीगत जलवाहिनीच्या कामाची किंमत गेली ७० वरून दिडशे कोटींवर

नेर-धामणा बॅरेज : भूमीगत जलवाहिनीच्या कामाची किंमत गेली ७० वरून दिडशे कोटींवर

Next
ठळक मुद्देपाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.
पाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. नेरधामणा बॅरेज प्रकल्पाच्या या कामाच्या निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे. विशेष म्हणजे या पाईपलाईन प्रणालीव्दारे ३० टक्के पाण्याची बचत होते.त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे त्याचे कोणतेही काम झालेले नाही. ३० टक्के बचत होणाºया पाण्यामुळे निंबोरा,पाळोदी इत्यादी मागणी असलेल्या गावांचा या लाभ क्षेत्रात समावेश करता येईल पण ते करणार कोण असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. तसेच यासाठी लागणाºया पंपीग मशीनची चाचणी घेऊन उच्च दाबाने शेतापर्यंत पणी पोहोचण्यात सक्षम आहे का याची खात्री करावी लागणार आहे. कारण ठिबक व तुषार सिंचनाने पिकांना पाणी देण्यासाठी २ ते ३ किलोग्रॅम प्रती सेमी. स्केवअर एवढा दाब शेतात मिळणे आवश्यक आहे. बॅरेजस्थळी जाण्यासाठी रस्ता नाही तर बॅरेजच्या गेटचे संचालन कसे करणार हा प्रश्न आहे. त्यासाठी फ्लड झोनचे काम करणे गरजेचे होते पण तेही झाले नाही.पाणीपुरवठ्यासाठी येथे विद्युतपुरवठा आवश्यक आहे त्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्र उभारणीच्या कामाचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
धामणा व नेर गावांच्या सुरक्षीततेसाठी या गावालगत घाट बांधून दोन गावांना जोडणाºया बाधीत रस्त्याची पूर्नस्थापना करावी लागणार असून, नदीचे पात्र रूद झाल्याने पुराच्या प्रवाहाची दिशा पावसाळ््यात बदलते असते. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतातील पिके व जमिन खरडून जाण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या पुराच्या प्रवाहाची दिशा बदलने गरजेचे आहे त्यासाठी जमिनीचे संपादन करू न त्याचा मोबदला संबधिताना द्यावा लागेल पण अद्याप एकाही कामाखा मूहुर्त निघाला नाही. पानेटव इतर तिर्थक्षेत्र या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात जात असल्याने ही तिर्थक्षेत्र योग्य ठिकाणी स्थलांतरीत करू न घाट बांधावा लागणार आहे. बुडीत क्षेत्रातील वाहिन्या बाहेर काढणे,उपनद्यावरील पूल रस्त्याची पुर्नस्थापना करावी लागणार आहे.

 

 

 

Web Title: Ner-Dhama Barrage: The cost of the barrage goes on 150 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.