राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविल्याने महानगरातील सर्व्हिस मार्गाचा पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:00 AM2017-12-09T00:00:32+5:302017-12-09T00:06:14+5:30

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याने, महानगरातील १२ मीटर रूंदीचा सर्व्हिस रोडचा पेच निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी ओव्हरलॅप  होणार असल्याने अपघातावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. 

National Highway to increase the width of the four-way, the service path of the metropolitan! | राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविल्याने महानगरातील सर्व्हिस मार्गाचा पेच!

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविल्याने महानगरातील सर्व्हिस मार्गाचा पेच!

Next
ठळक मुद्देशहरातून जाणारा सर्व्हिस मार्ग अनेक ठिकाणी होणार ओव्हरलॅपअपघातावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार

संजय खांडेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याने, महानगरातील १२ मीटर रूंदीचा सर्व्हिस रोडचा पेच निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी ओव्हरलॅप  होणार असल्याने अपघातावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. 

अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी महामार्गालगत ले-आऊट करताना ४५ मीटर चौपदरीकरणाची रूंदी आणि १२ मीटर सर्व्हिस रोड गृहित धरला गेला होता. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने आता चौपदरीकरणाची रूंदी ६0 मीटर केली आहे. त्यामुळे दोन्हीकडे साडेसात मीटरची रूंदी वाढविली जाणार आहे. त्यानंतर महामार्गाला समांतर जाणारा शहरातील सर्व्हिस रोड १२ मीटरचा अतिरिक्त तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व्हिस रोड शहरातून जात असताना एवढी जागा पुन्हा अधिग्रहित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले तर सर्व्हिस रोडच्या मुख्य उद्देशालाच छेद जाईल. त्या भागातील वाहतूक आतल्या आत झाली पाहिजे आणि अपघाताच्या घटनांवर अंकुश बसावा, म्हणून शहरातील महामार्गावर सर्व्हिस रोड काढले जातात; मात्र पुरेशी जागा अधिग्रहित करता न येत असल्याने सर्व्हिस रोड महामार्गाच्या भागावर ओव्हरलॅप होणार आहे. आधीच्या ले-आऊटनुसार सर्व्हिसमध्ये विसंगती निर्माण होत आहे. १२ मीटरऐवजी सर्व्हिस रोड साडेचार मीटरचा करणे शक्य होईल. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा सूर आवळला जात आहे. अकोला शहरातील एमआयडीसी, मलकापूर, खडकी, पातूर येथून हा सर्व्हिस रोड जाणार आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची रूंदी कमी केल्यास तो कायम सारखा राहू शकतो.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण शहरातून जात असताना अनेक ठिकाणी मुबलक  जागा मिळेलच असे नाही, त्यामुळे काही ठिकाणी तो ओव्हरलॅप होणार आहे. ६0 मीटर रूंदीनंतर १२ मीटर सर्व्हिस रोड शहरातून जावा, असा नियम आहे; मात्र काही ठिकाणी जागा नसेलच, त्या ठिकाणी तो कमी होऊ शकतो, अशा ठिकाणी सर्व्हिस रोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होऊ शकतो.
- विलास ब्राम्हणकर, कार्यकारी अभियंता, 
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, अमरावती.

Web Title: National Highway to increase the width of the four-way, the service path of the metropolitan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.