मूग, उडीद खरेदीला सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:49 AM2017-10-14T01:49:24+5:302017-10-14T01:49:32+5:30

यावर्षीच्या खरीप हंगामातील शासकीय मूग, उडीद खरेदीसाठी शुक्रवारी अकोला येथे एक व यवतमाळ जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी इतर जिल्ह्यात हमी दराने खरेदी केंद्रं सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

Mug, uradi, the start of the purchase! | मूग, उडीद खरेदीला सुरुवात!

मूग, उडीद खरेदीला सुरुवात!

Next
ठळक मुद्देवर्‍हाडात अकोला व यवतमाळ जिल्ह्यात तीन  केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामातील शासकीय मूग, उडीद खरेदीसाठी शुक्रवारी अकोला येथे एक व यवतमाळ जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी इतर जिल्ह्यात हमी दराने खरेदी केंद्रं सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
 मूग, उडीद खरेदीसाठी ३ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार विभागातही खरेदी केंद्रं सुरू होणे अपेक्षित होते. तथापि  ग्रेडरच पूरक प्रमाणात न मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब होत आहे. तसेच मूग, उडिदात असलेला ओलावा हेदेखील एक कारण सांगितले जात आहे.
अकोला येथील जिनिंग अँण्ड प्रेसिंगच्या आवारात जिल्हा निबंधक सहकारी संस्था मावळे यांच्या हस्ते अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी हमीदराने नाफेडमार्फत मूग, उडीद खरेदीला सुरुवात झाली. अकोला जिल्हय़ात एकच केंद्र सुरू करण्यात आले. हमीदरानुसार मुगाला ५,५७५ रुपये प्रतिक्विंटल, तर उडिदाला ५,४00 रुपये दर मिळणार आहेत. तसेच सोयाबीनचीही हमीदाराने खरेदी सुरू असून, सोयाबीनला ३ हजार ५0 रुपये तसेच ३0५ रुपये मिळून ३,३५५ रुपये दर दिले जात आहेत.
खरेदी कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा विपणन अधिकारी बजरंग ढाकरे, संजय कोरपे, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नरेंद्र वैराळे,  ग्रेडर गावंडे यांच्यासह ताखविसंचे मोजणी कर्मचारी, शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद अणि दिग्रस येथे मूग, उदीड खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. 

१२ टक्के ओलावा असावा!
शासकीय  खरेदी केंद्रावर १२ टक्के ओलावा असलेल्या मूग, उडिदाची खरेदी केली जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांना शेतीचा ७/१२ उतारा व पेरेपत्रक सोबत आणणे अनिवार्य आहे.

सोमवारी होणार इतर केंद्रं सुरू!
वर्‍हाडातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा येथील खरेदी केंद्रं सुरू केली जाणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ११ खरेदी केंद्रांची तयारी करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात एक शासकीय मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू केले आहे. ग्रेडरची उपलबद्धता जशी होईल, तसे इतर केंदं्र सुरू केले जातील.
- मनोज वाजपेयी,
अधिकारी, नाफेड, अकोला.

Web Title: Mug, uradi, the start of the purchase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती