मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्यावर आॅटोरिक्षांची  समोरासमोर धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:36 PM2018-03-12T18:36:18+5:302018-03-12T18:36:18+5:30

मूर्तिजापूर : भरधाव आॅटोंची समोरासमोर धडक झाल्याने एक जण गंभीर, तर चार जण जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी मूर्तिजापूर शहराजवळ घडली.

 At Maturajapur-Daryapur road, autorikshwa accident, one injured | मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्यावर आॅटोरिक्षांची  समोरासमोर धडक; एक गंभीर

मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्यावर आॅटोरिक्षांची  समोरासमोर धडक; एक गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देआॅटो क्रमांक एमएच ३० एफ ४२४५ व आॅटो क्र.एमएच ३० पी ९१०२ मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्याने समोरासमोर जात होतेनाका क्र.७ जवळ यातील एका आॅटोचे ब्रेक फेल झाले.आॅटो चालकाने धडक टाळण्यासाठी जबर ब्रेक मारल्याने आॅटो उलटला.


मूर्तिजापूर : भरधाव आॅटोंची समोरासमोर धडक झाल्याने एक जण गंभीर, तर चार जण जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी मूर्तिजापूर शहराजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, आॅटो क्रमांक एमएच ३० एफ ४२४५ व आॅटो क्र.एमएच ३० पी ९१०२ मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्याने समोरासमोर जात होते. दरम्यान, नाका क्र.७ जवळ यातील एका आॅटोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे हा आॅटो समोरून येत असलेल्या आॅटोवर धडकणार असताना चालकाने आॅटो रस्त्याच्या खाली उतरवला, तर दुसºया आॅटो चालकाने धडक टाळण्यासाठी जबर ब्रेक मारल्याने आॅटो उलटला. त्यामुळे, आॅटोमध्ये बसलेले एकनाथ टिके रा. भटोरी हे गंभीर जखमी झाले, तर प्रीती मधुकर, योगेश तायडे, सदाशिव चक्रे, राजकन्या (रा. सर्व भटोरी) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title:  At Maturajapur-Daryapur road, autorikshwa accident, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.