अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या वाहनाला जालन्याजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:31 PM2018-09-17T12:31:27+5:302018-09-17T12:34:29+5:30

अकोला - लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाहनाला जालना जिल्हयातील अंबड रोडवर अपघात झाल्याची घटना सोमवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली.

Madhukar Kamble vehicle Accident near Jalna | अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या वाहनाला जालन्याजवळ अपघात

अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या वाहनाला जालन्याजवळ अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देएका भरधाव ट्रकने कांबळे यांच्या वाहनाला धडक दिली, मात्र ते सुखरुप असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.कांबळे यांना सुदैवाने कोणतीही दुखपत झाली नाही. कांबळे यांच्या वाहनासोबत असलेल्या पोलीस सुरक्षा वाहनाने ट्रक आणि ट्रकचालकास तातडीने ताब्यात घेतले आहे.

अकोला - लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाहनाला जालना जिल्हयातील अंबड रोडवर अपघात झाल्याची घटना सोमवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. एका भरधाव ट्रकने कांबळे यांच्या वाहनाला धडक दिली, मात्र ते सुखरुप असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) जालना येथील एका स्थानिक कार्यक्रमाला जात असताना अंबड रोडवरील अशोका ढाब्याजवळ एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. मधुकरराव कांबळे यांच्या एम एच - ३८- जी.००९९ या कारला दिलेल्या धडकेत कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कांबळे यांना सुदैवाने कोणतीही दुखपत झाली नाही. मधुकरराव कांबळे यांच्या वाहनासोबत असलेल्या पोलीस सुरक्षा वाहनाने ट्रक आणि ट्रकचालकास तातडीने ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांच्या कारमध्ये असलेले स्विय सहाय्यक अनिल कांबळे, अंगरक्षक व वाहनचालक पाईकराव यांनाही सुदैवाने काहीही झाले नसल्याची माहिती कुटुंबीय व स्मारक समितीव्दारे देण्यात आली.

 

Web Title: Madhukar Kamble vehicle Accident near Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.