मुलाची हत्या करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 02:09 PM2019-05-05T14:09:53+5:302019-05-05T14:09:59+5:30

अकोला: डाबकी रोडवरील गजानन नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका बापाने पोटच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

Life imprisonment for killing a child | मुलाची हत्या करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास

मुलाची हत्या करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास

googlenewsNext

अकोला: डाबकी रोडवरील गजानन नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका बापाने पोटच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
गजानन नगरातील रहिवासी किसनराव बढे या नराधम बापाने त्याचा मुलगा प्रदीप याची वायरने गळा आवळून ११ सप्टेंबर २०१६ रोजी हत्या केली होती. प्रदीपची पत्नी गरोदर असल्याने प्रदीप स्वतंत्र खोली बांधून मागत होता. तर पिता किसनरावचा त्याला विरोध होता. किसनरावच्या मते त्याची दुसरी पत्नी म्हणजेच प्रदीपची सावत्र आई प्रदीपच्या सततच्या भांडणाने घरून निघून गेली होती. त्यामुळे किसनराव आधीच प्रदीपला त्रस्त होता. याच रात्री प्रदीपची पत्नी माहेरी असल्याने घरी बापलेकांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे प्रदीपची हत्या करण्याची हीच संधी सापडल्याने किसनरावने मुलाच्या गळ्याला वायर आवळली. गळफास बसल्याने प्रदीपचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी प्रदीपचा दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रदीपच्या पत्नीला आणि बहीणीला कळवण्यात आली होती. मुलाच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करून ठेवण्यात आली; मात्र मुलगा प्रदीप याची आंघोळ घालताना त्याच्या गळ्यावर व्रण दिसल्याने अनेकांना शंका आली. लगेच प्रदीपच्या मित्रांनी पोलिसांना कळवले. जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळावर पोहचले. त्यांना शंका आल्याने त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेला. तेथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर प्रदीपचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर प्रदीपची पत्नी संगीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तपास केला. यामध्ये प्रदीपच्या वडिलानेच खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी किसनराव याला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी किसनरावला ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.

 

Web Title: Life imprisonment for killing a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.