पंच वार्षिक आणि त्री वार्षिकविधी अभ्यासक्रमाची परीक्षा १५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:34 PM2018-02-22T13:34:55+5:302018-02-22T13:36:31+5:30

अकोला : पंच वार्षिक आणि त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Law semester examinations will be held from March 15 |  पंच वार्षिक आणि त्री वार्षिकविधी अभ्यासक्रमाची परीक्षा १५ मार्चपासून

 पंच वार्षिक आणि त्री वार्षिकविधी अभ्यासक्रमाची परीक्षा १५ मार्चपासून

Next
ठळक मुद्देपहिल्या सेमिस्टरची परीक्षा १५ ते २४ मार्चपर्यंत होईल. दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा २१ मे ते ३० मे पर्यंत होईल. तिसºया सेमिस्टरची परीक्षा १६ मार्च ते २६ मार्चपर्यंत होईल. चौथ्या सेमिस्टरची परीक्षा २० एप्रिल ते २ मेपर्यंत होणार आहे. पाचव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्चपर्यंत होईल.


अकोला : पंच वार्षिक आणि त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. उशिरापर्यंत प्रवेश प्रक्रिया चालल्याने यंदा विधी अभ्यासक्रमात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी अभ्यासासाठी मिळाला नसल्याची ओरड आहे.
पंच वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा १५ ते २४ मार्चपर्यंत होईल. दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा २१ मे ते ३० मे पर्यंत होईल. तिसºया सेमिस्टरची परीक्षा १६ मार्च ते २६ मार्चपर्यंत होईल. चौथ्या सेमिस्टरची परीक्षा २० एप्रिल ते २ मेपर्यंत होणार आहे. पाचव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्चपर्यंत होईल. सहाव्या सेमिस्टरची परीक्षा २१ एप्रिल ते ३ मे पर्यंत होईल. सातव्या सेमिस्टरची परीक्षा १६ ते २८ मार्चदरम्यान होईल. आठव्या सेमिस्टरची परीक्षा २० एप्रिल ते ४ मे पर्यंत होईल. नवव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्चपर्यंत आणि शेवटच्या दहाव्या सेमिस्टरची परीक्षा २१ ते २४ एप्रिलदरम्यान होणार आहे.
त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्च, दुसºया सेमिस्टरची परीक्षा २१ मे ३०, तिसºया सेमिस्टरची परीक्षा १६ मार्च ते २६ मार्च, चौथ्या सेमिस्टरची परीक्षा २० ते २७ एप्रिल, पाचव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २४ मार्च, सहाव्या सेमिस्टरची परीक्षा २१ ते २८ एप्रिलपर्यंत राहणार आहे. यासोबतच विधीच्या एलएलएम परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन झाल्यापासून वेळापत्रक आणि इतर प्रक्रियादेखील आॅनलाइन होत आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विधी महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Law semester examinations will be held from March 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.