Krishi University's purified Kardai oil! | आता कृषी विद्यापीठाचे शुध्द करडी तेल !
आता कृषी विद्यापीठाचे शुध्द करडी तेल !

- राजरत्न सिरसाट

अकोला : आरोग्यासाठी पोषक शुध्द करडी तेलाचे उत्पादन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केले असून, यासाठीचा तेलबिया प्रक्रिया प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सुरू वातीला तयार करण्यात आलेले तेल राज्यपालांना पाठविण्यात आले आहे.
कृषी विद्यापीठाचे मुख्य बिजोत्पादन व मध्यवर्ती संशोधन केंद्रातंर्गत प्रक्षेत्रावर करडी पेरणी करण्यात आली परंतु उत्पादीत करडीला बाजारभाव नसल्याने कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी करडीचे मुल्यवर्धन करण्याचा निर्णय घेऊन ही जबाबदारी कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांच्यावर सोपवली.या विभागाने तेलबिया प्रक्रिया प्रकल्प उभा केला असून, करडीचे दर्जेदार,शुध्द तेल उत्पादन सुरू केले आहे. तेलाचे परीक्षण करू न बॉटलींग व लेबलींग करण्यात आले आहे. सुरू वातीला हा छोटा प्रकल्प तयार करण्यात आला.१,४०० क्ंिवटल करडीची प्रक्रिया करू न २८० किलो तयार करण्यात आले. त्यातील दोन दिवसातच २१० किलो तेल वितरीत (विक्री)करण्यात आले आहे.
करडीच्या तेल आरोग्यवर्धक असून,यात खनीज प्रमाण सर्वाधिक तर आहेत तसेच कॅल्सीयम व आयर्नचे प्रमाणही भरपूर असल्याने बाजारात करडी तेलाची मागणी आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची शुध्द तेलाची मागणी असून, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कृषी विद्यापीठात येणाºया अकोलेकरांनाही तेल उपलब्ध करू न देण्यासाठी कृषी विद्यापीठाचा विस्तार विभाग कामाला लागला आहे.
- राज्यपाल,लोकप्रतीनिधींना पाठवले तेल
परीक्षण केलेले तेल कृषी विद्यापीठाने राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनींधीनाही दिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या याबाबत अनुकूल प्रतिक्रया प्राप्त झाल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.

- करडीचे मुल्यवर्धन करण्यासाठी तेलबिया प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले असून, तेलाचे उत्पादनही करण्यात आले .हे तेल आरोग्यवर्धक असल्याने करडीच्या तेलाला मागणी आहे.शेतकºयांनही असेच छोटे शेतमाल प्रक्रिया केंद्र उभे करावे. आम्ही तंत्रज्ञान समजावून सांगू.
डॉ. व्ही.एम.भाले,
डॉ.पंदेकृवि,
अकोला.

 


Web Title: Krishi University's purified Kardai oil!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.