माझी पोर जिवंत आहे की नाही? आईची पोलिसांना विचारणा; पळवून नेलेली मुलगी वर्षभरापासून बेपत्ताच, घातपाताचा संशय

By राजेश शेगोकार | Published: May 5, 2023 06:22 PM2023-05-05T18:22:52+5:302023-05-05T18:23:20+5:30

मुलगी जिवंत आहे की तिचा काही घातपात झाला, असा संशय मुलीच्या आईने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

Is my daughter alive or not mother Questioning to the police The abducted girl has been missing for a year, suspected to be an accident | माझी पोर जिवंत आहे की नाही? आईची पोलिसांना विचारणा; पळवून नेलेली मुलगी वर्षभरापासून बेपत्ताच, घातपाताचा संशय

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

अकोला : कैलास टेकडी परिसरातील अल्पवयीन मुलीला परिसरातील एका युवकाने फूस लावून पळवून नेले. वर्ष उलटूनही मुलीचा शोध लागू शकला नाही. मुलगी जिवंत आहे की तिचा काही घातपात झाला, असा संशय मुलीच्या आईने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

मुलीच्या आईने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणात खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी १२ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. वर्ष उलटूनही मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाचा पोलीस शोध घेऊ शकले नाहीत. पोलिसांकडून प्रयत्न होत नसल्याने, मुलीच्या आईने पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली. मुलीला पळवून नेण्यात युवकाच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली असतानाही पोलिसांनी त्यांची चौकशीसुद्धा केली नसल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे सोपवण्यात आले; परंतु, या कक्षाच्या पोलिसांनाही मुलीचा शोध घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मुलीचा काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय मुलीच्या आईने तक्रारीतून व्यक्त करीत, मुलीचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.
 

Web Title: Is my daughter alive or not mother Questioning to the police The abducted girl has been missing for a year, suspected to be an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.