अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात ३० डिसेंबरला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:30 PM2017-12-29T13:30:42+5:302017-12-29T13:34:42+5:30

अकोला : सीताबाई महाविद्यालयात राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत व महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३० डिसेंबरला करण्यात आले आहे.

The Inter-University National Council on December 30 at Sitabai College | अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात ३० डिसेंबरला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद

अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात ३० डिसेंबरला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद

Next
ठळक मुद्दे‘भारतीय लोकशाही: आव्हाने आणि उपाय’ या मुख्य संकल्पनेवर आधारित एक दिवसीय परिषद.विविध विषयांवर देशातील विविध ठिकाणाहून आलेले संशोधक आपले विचार मांडणार आहेत.

अकोला : सीताबाई महाविद्यालयात राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत व महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३० डिसेंबरला करण्यात आले आहे.
राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, तर अतिथी म्हणून दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. मोतिसिह मोहता, विदर्भ राज्यशास्त्र परिषदेच्या अध्यक्ष डॉ. अलका देशमुख, ‘बीजीई’चे कार्यकारी सदस्य प्रा. एस. आर. अमरावतीकर यांची उपस्थिती राहील. बीजभाषक म्हणून अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालय इंदूर चे प्रा. डा. संजय जैन राहणार आहेत.
‘भारतीय लोकशाही: आव्हाने आणि उपाय’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय परिषदेत दहशतवाद, नक्षलवाद, प्रांतियवाद आणि सीमा प्रश्न, भाषावाद, लहान राज्य मागणी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार, बेरोजगार, गरिबी, जीएसटी अशा विविध विषयांवर देशातील विविध ठिकाणाहून आलेले संशोधक आपले विचार मांडणार आहेत. दुपारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी अकोला आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी हे उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून नाशिक येथील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्राचार्य डॉ. आलिम वकील राहणार असल्याची माहिती सचिव डॉ. रतन राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The Inter-University National Council on December 30 at Sitabai College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.