‘सीए’ परीक्षेत अकोल्याच्या प्राचीने घडविला इतिहास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:36 AM2018-01-19T01:36:07+5:302018-01-19T01:36:41+5:30

अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत बाजी मारणारी प्राची ही जिल्हय़ातील पहिली विद्यार्थिनी आहे. सीए-सीपीटी परीक्षेत आयुष राठी याने जिल्हय़ातून प्रथम येण्याचा मान पटकावला. 

History of Akola's history in 'CA' exam! | ‘सीए’ परीक्षेत अकोल्याच्या प्राचीने घडविला इतिहास!

‘सीए’ परीक्षेत अकोल्याच्या प्राचीने घडविला इतिहास!

Next
ठळक मुद्देसीए-सीपीटी, आयपीसीसी व फायनल निकालसीपीटी परीक्षेत आयुष राठी जिल्ह्यात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत बाजी मारणारी प्राची ही जिल्हय़ातील पहिली विद्यार्थिनी आहे. सीए-सीपीटी परीक्षेत आयुष राठी याने जिल्हय़ातून प्रथम येण्याचा मान पटकावला. 
प्राचीने ही परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे आता अकोल्यात १४ सनदी लेखापालांमध्ये भर पडली आहे. सीए फायनल परीक्षेत करण केडिया व शुभम शर्मा यांनी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण करीत अकोल्यातून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले आहे. तसेच मंगेश हिंगणे यानेसुद्धा सीए फायनल परीक्षेत बाजी मारली. यासोबतच सीए फायनल परीक्षेत भारती तापडिया, भरत हरकूट, मिनल लटुरिया, अंकिता लढ्ढा, नीलेश भराडे, साहिल भसीन, यश सलामपुरिया, अंकिता गट्टानी, सागर दीक्षित, शीतल मुनोत यांनी सीए (सनदी लेखपाल) ची पदवी प्राप्त करण्यात यश मिळविले.  सीए-सीपीटी परीक्षेत आयुष राठी याने प्रथम स्थान पटकावले, तर पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्याचा मान हर्ष अडरेजा, रिया झुनझुनवाला, प्रणय अग्रवाल, पीयूष मोहनानी, भावना चौधरी, श्रद्धा सूर्यवंशी, संदेश अग्रवाल, ज्ञानेश्‍वरी दोड, दीक्षा जोशी, हर्षा चुडीवाले, राहुल गही, पंकज जेसवानी, सारंग पाठक यांनी पटकावित दणदणीत यश प्राप्त केले. हे सर्व विद्यार्थी आरसीएफमध्ये (राठी करिअर फोरम) शिकणारे असून, त्यांना प्रा. नीरज राठी यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
Web Title: History of Akola's history in 'CA' exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.