'जीएमसी' अकोला : चौकशी समिती बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांचे आंदोलन मागे 

By Atul.jaiswal | Published: March 12, 2018 05:04 PM2018-03-12T17:04:35+5:302018-03-12T17:04:35+5:30

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारीकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेली चौकशी समिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सोमवारी बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांनी त्यांचे कामबंद आंदोलन मागे घेतले.

'GMC' Akola: After the dissolution of the inquiry committee, nurses agitation stalled | 'जीएमसी' अकोला : चौकशी समिती बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांचे आंदोलन मागे 

'जीएमसी' अकोला : चौकशी समिती बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांचे आंदोलन मागे 

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. वैशाली कोटंबकर (कोरडे)आणि अधिपरिचारिका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवार, ७ मार्च रोजी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहचला होता. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समिती गठीत करतानाच अधिपरिचारिका जयश्री भदे व अधिसेविका ग्रेसी मरीयम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सोमवारी सकाळी अधिपरिचारिकांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या देऊन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला.


अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारीकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेली चौकशी समिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सोमवारी बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांनी त्यांचे कामबंद आंदोलन मागे घेतले.
वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सहयोग प्राध्यापक डॉ. वैशाली कोटंबकर (कोरडे)आणि अधिपरिचारिका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवार, ७ मार्च रोजी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहचला होता. परस्पर विरोधी तक्रारींवरून गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणी डॉ. वैशाली कोटंबकर यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समिती गठीत करतानाच अधिपरिचारिका जयश्री भदे व अधिसेविका ग्रेसी मरीयम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वैयक्तिक स्वरुपाच्या वादात महाविद्यालय प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे अधिपरिचारिकांच्या संघटनेने ग्रेसी मरीयम यांच्याविरुद्धची कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी, तसेच अधिसेविका जयश्री भदे यांना बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी करीत शनिवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. सोमवारी सकाळी अधिपरिचारिकांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या देऊन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. अखेर डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या प्रकरणी गठीत केलेली चौकशी समिती बरखास्त करून अधिसेविका ग्रेसी मरियम यांच्या विरुद्ध बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर अधिपरिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.

अधिपरिचारिका व सहयोगी प्राध्यापक यांच्यातील वाद हा वैयक्तिक स्वरुपाचा असून, दोघींनीही परस्परांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी संबंधितांना बजावलेल्या नोटीस मागे घेतल्या व चोकशी समितीही गुंडाळली आहे. रुग्णसेवा अविरत सुुरु ठेवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

Web Title: 'GMC' Akola: After the dissolution of the inquiry committee, nurses agitation stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.