आर्थिक गैरव्यवहार: मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:51 PM2019-02-05T13:51:04+5:302019-02-05T13:51:52+5:30

मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

Financial mischief: Gramsevak was suspended from the gram panchayat. | आर्थिक गैरव्यवहार: मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित!

आर्थिक गैरव्यवहार: मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ४ फेब्रुवारीला ही धडक कारवाई केली. 
प्राप्त माहितीनुसार, मारसूळ ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून केलेल्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार अभिराज अशोकराव घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. त्यावरून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे अहवाल सादर केला. ग्रामपंचायतीने अंदाजपत्रकातील तरतूदीनुसार कामे न करता चुकीच्या पद्धतीने खर्च करून अनियमितता केली आहे. अंगणवाडी दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांच्या निधीची अफरातफर केली. 
यासह सरपंच, सचिव यांनी ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांच्या रक्कमा स्वत:च्या नावे काढून महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता नियम २४ (१) चे उल्लंघन केले आहे. अंदाजपत्रकानुसार कामे केली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) अधिनियम १९६४ मधील नियम ३ (१) नुसार आर्थिक गैरव्यवहार करणे आणि कर्तव्यात करूर केल्याचा ठपका ठेवून ग्रामसेवक दिलीप वाहोकार यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, या धडक कारवाईमुळे बेजबाबदारपणाचे धोरण अंगिकारणाºया जिल्ह्यातील इतर ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Financial mischief: Gramsevak was suspended from the gram panchayat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.