ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात पिता-पुत्र जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:45 AM2018-01-10T01:45:40+5:302018-01-10T01:45:53+5:30

निंबा फाटा : नजीकच्या निंबा फाटा ते शेगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामातील मातीची कवठा येथे वाहतूक करणारा भरधाव ट्रक व मोटारसायकलची जबर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील पिता-पुत्र जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोल्याच्या सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Father-son injured in truck-motor crash | ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात पिता-पुत्र जखमी

ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात पिता-पुत्र जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देभरधाव ट्रक व मोटारसायकलची जबर धडक 

लोकमत न्यूज नेटवर्क

निंबा फाटा : नजीकच्या निंबा फाटा ते शेगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामातील मातीची कवठा येथे वाहतूक करणारा भरधाव ट्रक व मोटारसायकलची जबर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील पिता-पुत्र जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोल्याच्या सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
माती वाहतूक करणार्‍या ट्रक क्रमांक एच १६ एई ९९३४ ची व एमएच ३0 एवाय ५४१८ क्रमांकाच्या मोटारसायकलची ९ जानेवारी रोजी धडक झाली. या अपघातात बळीराम चव्हाण (५0) व सोपान चव्हाण (२0) हे पिता-पुत्र जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी  अपघातातील जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातहलविण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताबाबत उरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नाही. 
 

Web Title: Father-son injured in truck-motor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.