पीक विमा योजनेला ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:40 AM2017-08-01T02:40:02+5:302017-08-01T02:40:44+5:30

अकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकरी वंचित राहू नये यासाठी पीक विम्याची मुदत संपली असून राज्यभरातील शेतकºयांकडून मुदतवाढीसाठी मागणी करण्यात येते होती. शासनाने ही मागणी मान्य केली असून ५ आॅगस्टपर्यंत पीक विमा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Extension of crop insurance scheme by 5th August | पीक विमा योजनेला ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ!

पीक विमा योजनेला ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ!

Next
ठळक मुद्देकृषिमंत्र्यांचा पुढाकार : शेतक-यांना दिलासाअर्ज बँकेतच स्वीकारले जातील - ना. फुंडकर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकरी वंचित राहू नये यासाठी पीक विम्याची मुदत संपली असून राज्यभरातील शेतकºयांकडून मुदतवाढीसाठी मागणी करण्यात येते होती. शासनाने ही मागणी मान्य केली असून ५ आॅगस्टपर्यंत पीक विमा अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शेतकºयांनी या योजनेसाठीचे वाढीव मुदतीमध्ये अर्ज भरावेत, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खास ‘लोकमत’शी बोलताना केले.
पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती केली होती. मुदवाढीला संमती मिळण्यापूर्वीच संबंधित यंत्रणेला अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र व संबंधित विमा कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर केंद्राला मुदत वाढविण्यासाठीची विनंती करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या दालनात सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली या बैठकीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलीक, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते. या बैठकीत ५ आॅगस्टपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्राची योजना असून, गेल्या वर्षी एक कोटी शेतकºयांनी सहभाग घेतला होता. या वर्षीही अंतिम दिनांकापर्यंत आलेल्या सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, या योजनेंतर्गत आॅनलाइन विमा काढण्यासाठी शेतकºयांनी सोमवारी विविध बँकांच्या शाखांमध्ये गर्दी केली. तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यापासून वंचित असल्याने मुदतवाढ देण्यात यावी यासाठीची मागणी अनेक पक्ष, संघटनांच्यावतीने करण्यात आली होती, हे विशेष.

Web Title: Extension of crop insurance scheme by 5th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.