अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ

By atul.jaiswal | Published: December 29, 2017 12:51 PM2017-12-29T12:51:34+5:302017-12-29T12:59:24+5:30

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरमहा १२ टक्के प्रमाणे कर्मचारी हिस्सा कपात करण्यात येत आहे. परंतु, शासनाचा आदेश असतानाही जिल्हा स्तरावर स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले नसल्याने या कर्मचाऱ्यांची गत वर्षभरात कपात झालेली रक्कम त्यांच्या ईपीएफ खात्यावर अद्यापही जमा झालेली नाही. याबाबत प्रशासकीय यंत्रणाही अनभिज्ञ असून, ही रक्कम शोधण्यासाठी आता धावपळ सुरू झाली आहे.

'EPF' missing from 252 'NHM' employees annually in Akola district | अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ

अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ

Next
ठळक मुद्दे१५ हजार रुपयांपर्यंत मानधन घेणाºया राज्यातील सर्व कंत्राटी  कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१५ पासून ईपीएफ सुविधा लागू करण्यात आली आहे.जिल्ह्यात एनएचएम अंतर्गत ४५० अधिकारी/कर्मचारी कार्यरत असले, तरी १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधन घेणाऱ्यांची संख्या २५२ एवढी आहे.जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरमहा १२ टक्के प्रमाणे कर्मचारी हिस्सा कपात करण्यात येत आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरमहा १२ टक्के प्रमाणे कर्मचारी हिस्सा कपात करण्यात येत आहे. परंतु, शासनाचा आदेश असतानाही जिल्हा स्तरावर स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले नसल्याने या कर्मचाऱ्यांची गत वर्षभरात कपात झालेली रक्कम त्यांच्या ईपीएफ खात्यावर अद्यापही जमा झालेली नाही. याबाबत प्रशासकीय यंत्रणाही अनभिज्ञ असून, ही रक्कम शोधण्यासाठी आता धावपळ सुरू झाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या तसेच १५ हजार रुपयांपर्यंत मानधन घेणाºया राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाºयांना १ एप्रिल २०१५ पासून ईपीएफ सुविधा लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एनएचएम अंतर्गत ४५० अधिकारी/कर्मचारी कार्यरत असले, तरी १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधन घेणाºयांची संख्या २५२ एवढी आहे. त्यावेळी शासनाने सर्व कर्मचाºयांच्या खात्यात ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची शासन हिश्श्याची रक्कम एकत्रित जमा केली. तसेच १ जानेवारी २०१७ पासून कर्मचाºयांच्या मानधनातून १२ टक्के ईपीएफ हिस्सा कपात करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार या कर्मचाºयांच्या मानधनातून दरमहा नियमितपणे ईपीएफ सहभागाची रक्कम कपात करण्यात येत आहे. या कर्मचाºयांच्या ईपीएफचा भरणा बँक खात्याद्वारे आॅनलाइन करण्याबाबत तसेच कार्यालयीन हिस्सा बँक खात्यात जमा करण्याबाबतच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी निर्गमित केल्या आहेत. परंतु, त्या दिशेने संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीविषयक नियमित कामे करण्यासाठी बाह्यसेवा पुरवठादार संस्थेची नियुक्ती करून ज्या जिल्हास्तरीय संस्थांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ‘इस्टॅब्लिशमेंट कोड’ प्राप्त झाला आहे, अशा सर्व संस्थांना भविष्य निर्वाह निधीचा आॅनलाइन भरणा करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे जिल्हा स्तरावर/संस्था स्तरावर भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा लेखा व्यवस्थापक यांच्याकडे या स्वतंत्र खात्याची संयुक्त जबादारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर मात्र अद्यापपर्यंत स्वतंत्र खाते उघडण्यात न आल्यामुळे या २५२ कर्मचाºयांच्या वेतनातून जानेवारीपासून कापण्यात आलेली १२ टक्के रक्कम कुठे गेली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लगतच्या वाशिम जिल्ह्यात मात्र एनएचएम कर्मचाºयांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे.

ईपीएफ खात्यात गतवर्षीएवढीच रक्कम
एनएचएम कर्मचाºयांना ईपीएफ सुविधा लागूू करताना शासनाने १ एप्रिल २०१५ पासून ते डिसेंबर २०१६ पर्यंत शासनाचा हिस्सा या कर्मचाºयांच्या खात्यात जमा केला. त्यानंतर दरमहा मानधनातून १२ टक्के याप्रमाणे कपात होत असतानाही या कर्मचाºयांच्या ईपीएफ खात्यांमध्ये ३१ डिसेंबर २०१६ रोजी जमा असलेली रक्कमच आजही दिसून येत आहे.

एनएचएम कर्मचाºयांच्या ईपीएफ कपातीसंदर्भात मला माहिती नाही. यासंदर्भात माहिती घेऊन, यापुढे शासनाच्या दिशानिर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

 

Web Title: 'EPF' missing from 252 'NHM' employees annually in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.