अकोल्यातील दुष्काळी गावं झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 09:17 PM2017-07-22T21:17:50+5:302017-07-22T21:17:50+5:30

जलसंधारणाच्या कामांमुळे अकोल्यातील दुष्काळी गावांमध्ये पाणी साठा तयार होत आहे.

Drought-affected villages in Akola | अकोल्यातील दुष्काळी गावं झाली पाणीदार

अकोल्यातील दुष्काळी गावं झाली पाणीदार

Next
>गजानन वाघमारे /ऑनलाइन लोकमत
अकोला (बार्शीटाकळी), दि. 22 -  बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथे 8 एप्रिलपासून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये माथा ते पायथा याप्रकारे  करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या सलग समतल चरांमध्ये १९ जुलै रोजी झालेल्या पावसाचे पाणी साठले असून, यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले आहे. 
 
पूर्वी वाहून जाणारे पाणी आता या समतल चरामध्ये साचवले जात आहे. पहिल्याच पावसाचा प्रत्येक थेंब जणू गावाच्या शिवारात मुक्कामीच थांबल्याचा भास व्हावा असे मनोहरी चित्र निर्माण झाले आहे. 
 
पुनोती बु. येथे पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत सलग समतल चरांसह जलसंधारणाच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही कामे करण्यासाठी तालुकाचे तहसीलदार रवी काळे, नायब तहसीलदार अतुल पाटोळे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, संघपाल वाहूरवाघ, कृषी विभागाचे कृषी सहायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील माजी पंचायत समिती सदस्य राजू काकड, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, शेतकरी व वॉटर हिरोंनी श्रमदान केले. 
 
त्याची फलनिष्पत्ती १९ जुलैच्या रात्री बार्शीटाकळी तालुक्यात त्यातही पुनोती बु. परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सर्व सलग समतल चर व जलसंधारणाच्या अन्य  बंधा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले असून,  गावाची पाणीटंचाई कायम स्वरूपी दूर होणार असल्याचा आत्मविश्वास आता गावक-यांमध्ये निर्माण झाला आहे.
 
पुनोती बु. येथे मागील काही वर्षात जिल्हा प्रशासनाद्वारे दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.  गाव क्षेत्रामधील जलस्रोतांची पाणीपातळी खूप खोल गेल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली होती. 
 
त्यावर उपाय म्हणून सरपंच अमोल काकड यांनी यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या जलसंधारणाच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभाग घेऊन गावचा माथा असलेल्या भागात सलग समतर चर, डीप सलग समतर चरांचे काम केले. १९ जुलैच्या रात्री पडलेल्या पावसामुळे हे चर उत्तमरीत्या भरले असून, मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. यावर्षी पावसाच्या थेंबांनी जणू गावात मुक्कामच केला असल्याचे चित्र पुनोती बु. येथे पाहावयास मिळत आहे. गावकºयांनी केलेल्या कामातून गाव पाणीदार बनविले आहे.
 

Web Title: Drought-affected villages in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.