विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:49 PM2018-12-19T15:49:25+5:302018-12-19T15:49:59+5:30

२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Congress preapare to claim 161 constituencies for the assembly election | विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

Next

अकोला: भाजपा विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी सध्या काँग्रेस पुढाकार घेत असून, लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकींचेही नियोजन पक्षपातळीवर केले जात आहे. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
२०१४ च्या विधानसभेची निवडणूक काँग्रसने स्वबळावर लढविली होती. यावेळी २८७ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ ४२ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. या निवडणुकीत ७१ मतदारसंघांमध्ये काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या ७१ मतदारसंघांमध्ये राष्टÑवादीने सात जागांवर विजय मिळविला होता, तर ६४ मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष राष्टÑवादीपेक्षा आघाडीवर होता. तसेच काँग्रेस पक्ष तिसºया क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघांची संख्या ५३ असून, त्यामध्ये ३३ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मते काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली होती तर काँग्रेस चवथ्या क्रमांकावर असलेल्या ६९ मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मताधिक्य काँग्रेसने घेतले होते. अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघात मिळालेल्या मतांची राष्टÑवादीला मिळालेल्या मतांसोबत तुलना करून विश्लेषण तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाची आघाडी असताना २००४ व २००९ मध्ये काँग्रेसने अनुक्रमे १५७ व १७० जागा लढल्या होत्या. त्यामुळे १६१ मतदारसंघ हे राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अनुकूल असल्याचे गणित मांडले जात आहे. या गणिताच्या आधारावरच राष्टÑवादी काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा केली जाणार असून, त्यामध्येच मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणते मतदारसंघ सोडले जातील, हे ठरविले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.


मागील निवडणूक निकालाचे विश्लेषण अन् आता बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन जागांची अदलाबदल होऊ शकते, तसेच मित्रपक्षांची ताकद असलेल्या मतदारसंघांचाही विचार करून काँग्रेस जागा वाटपाबाबत वाटाघाटी करेल. आकडा कमी-जास्त होऊ शकतो कारण भाजपा विरोधात एकत्र येणे हे जास्त महत्त्वाचे आहे.
- आ. हर्षवर्धन सपकाळ, अ.भा. सरचिटणीस काँग्रेस.


यापूर्वीच्या तीनही विधानसभेच्या निवडणुकीचा फार्म्युला अमलात आणला तरीही काँग्रेसला १६१ जागा अनुकूल ठरतात. या संदर्भात प्रदेश कार्यालयात चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे वाटाघाटीच्या वेळी वस्तुस्थितीला धरून जागांची मागणी पक्षाकडून केली जाईल.
 - डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ता, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटी

 

Web Title: Congress preapare to claim 161 constituencies for the assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.