महावितरण कार्यालयात तक्रार पेट्या लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:13 PM2017-10-28T14:13:52+5:302017-10-28T14:15:17+5:30

Complaint boxes in the office of MSEDCL | महावितरण कार्यालयात तक्रार पेट्या लावा!

महावितरण कार्यालयात तक्रार पेट्या लावा!

Next


अकोला: महावितरणच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी वीज ग्राहकांना नियमित वेळ देऊन त्यांच्या तक्रारी, सूचना जाणून घ्याव्यात, ग्राहकांसाठी आपण सहजपणे उपलब्ध झाल्यास ग्राहकही थेट आपल्याकडे येईल, कुणा मध्यस्थामार्फत येणार नाहीत यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची सुविधा निर्माण करा. मुळात मध्यस्थांमुळेच अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्राहकांसाठी पुरेसा वेळ राखून ठेवा, असे निर्देश नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. अकोला येथे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांच्या आढावा बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केले.
महावितरण ही देशातील सर्वाधिक व्याप्ती असलेली वीज वितरण कंपनी आहे, येथील कर्मचाºयांचा पगारही इतरांच्या तुलनेत भरीव आणि आकर्षक असताना केवळ थोड्या लालसेपोटी कंपनीची जनमानसातील प्रतिमा मलीन होते. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरकृत्यापासून सदैव लांबच राहा. महावितरणमधील बहुतांश कर्मचारी चांगले काम करीत आहेत; मात्र केवळ चांगले काम करून भागत नाही तर आपला एखादा सहकारी गैरकृत्य करीत असेल तर त्याला अटकाव करण्याचीही गरज आहे. तुमच्या प्रतिबंधाला तो जुमानत नसेल तर वरिष्ठांना त्याची कामे निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही खंडाईत यांनी केल्या.

तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांक
ग्राहकांना त्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत ७८७५७६३३५० हा दूरध्वनी क्रमांक उपल्ब्ध करून देण्यात आला असून, त्यावर आलेल्या तक्रारींची दखल स्वत: मुख्य अभियंता घेणार आहेत. याशिवाय महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयानेही यासाठी हेल्पलाइन सुरू केली असून, तेथील ०२२-२६४७८९८९ किंवा ०२२-२६४७८८९९ या क्रमांकावर ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात. दूरध्वनीवर बोलतानाही ग्राहक दुखाविला जाणार नाही, याची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

औद्योगिक संघटनेसोबत चर्चा
अकोला शहरातील उद्योजकांच्या तक्रारी आणि सूचना ऐकण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी इंडस्ट्रियल असोसिएशच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली. यावेळी शक्य तेवढ्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करण्यात येऊन उर्वरित तक्रारींच्या सोडवणुकीसाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकांनी दिल्या.

 

Web Title: Complaint boxes in the office of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.