पातूर घाटात ट्रेलरची बसला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:13 PM2019-03-23T18:13:54+5:302019-03-23T18:14:34+5:30

पातूर (अकोला): भरधाव ट्रेलरने बसला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी पातूर-मालेगाव रस्त्यावरील घाटात घडली.

Bus and truck coliaded, two serious | पातूर घाटात ट्रेलरची बसला धडक, दोन गंभीर

पातूर घाटात ट्रेलरची बसला धडक, दोन गंभीर

Next

पातूर (अकोला): भरधाव ट्रेलरने बसला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी पातूर-मालेगाव रस्त्यावरील घाटात घडली. सुदैवाने बस चालकाने नियंत्रण मिळवल्याने ४० प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतरअपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना एक तास ताटकळत बसावे लागले.
अकोल्यावरून पुसदकडे बस क्र.एमएएच ४० एन ८२७५ ही दुपारी १ वाजता जात होती. दरम्यान, पातुरजवळ असलेल्या घाटात समोरुन येत असलेल्या ट्रेलर क्र.एचआर ५५ आर ४८६१ ने बसला जबर धडक दिली. यामध्ये बस मधील हेडा नावाची महिला व सुधाकर दिनकर गंगावने रा. देपुर ता. वाशीम हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच पातूर वाहतूक पोलीस वर्मा, जायभाय, पांडे मेजर , दुतोंडे आदींनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे रवाना केले.या अपघातामुळे अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागली. भरउन्हात बसमधील प्रवाशी एक तास ताटकळत बसले होते. एका तासानंतर आलेल्या दुसऱ्या बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Bus and truck coliaded, two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.